हा अडथळा होणार दूर?
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील शेलू हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकातून ट्रेन पकडत असतात. भविष्यात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या स्थानकावरही विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. काम झाल्यानंतर शेलू स्थानकावरही 15 डब्ब्यांच्या लोकलचा थांबा मिळू शकेल.
'लेडीज स्पेशल'लोकलची मागणी
advertisement
गर्दीचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत आहे. बदलापूरपासून पुढे अनेक स्थानकांवर महिलांना उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे महिला डब्यांमध्ये अनेकदा वादही होतात. या पार्श्वभूमीवर मुंबई ते कर्जत-खोपोली मार्गावर महिलांसाठी विशेष महिला लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 2:00 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! आता 'या' स्थानकावर थांबणार 15 डब्यांची लोकल, महिलांसाठी स्पेशल ट्रेन
