TRENDING:

Thane : कल्याण-ठाणेचा कायापालट होणार; उपमु्ख्यंत्री एकनाथ शिंदे यांच मोठे गिफ्ट

Last Updated:

Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण-ठाणे परिसराच्या पायाभूत सुविधांसाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्पांना गती मिळाल्याने वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : नुकत्याच सादर झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात ठाणे पल्याडच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारा निर्णय मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण च्या 2026-27अर्थसंकल्पातून घेण्यात आला आहे.
मेट्रो कामाला गती 
मेट्रो कामाला गती 
advertisement

एमएमआरडीए अर्थसंकल्पात कल्याणला मोठी झेप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिक आणि प्रमुख रस्ते प्रकल्पांना एकूण 4 हजार 897.19 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे ठाणे परिसरापुरता मर्यादित राहिलेला मोठा पायाभूत विकास आता कल्याण लोकसभा मतदारसंघातही वेगाने विस्तारताना दिसणार आहे.

अनेक प्रकल्पांना मिळणार गती

advertisement

या परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, उन्नत मार्ग, रिंग रस्ता मार्गांच्या उभारणीच्या कामाला गती मिळेल.मुंब्रापासून सुरू होणारा कल्याण लोकसभा मतदारसंघ थेट अंबरनाथपर्यंत विस्तारलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असलेला हा मतदारसंघ खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गेल्या काही वर्षात अनेक महत्वाच्या प्रकल्पांची सुरूवात झाली आहे. अनेक प्रकल्पांचे काम सुरू असून नव्याने तरतूद करण्यात आलेल्या निधीमुळे अनेक प्रकल्पांना गती मिळण्याची आशा आहे.या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

advertisement

तसेच पलावा, शिळफाटा येथील कोंडी फुटण्यास मदत होईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐरोली ते काटई या उन्नत आणि मुक्त मार्गाच्या कामासाठी 900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाचे काम भूसंपादनाच्या कामामुळे रखडले होते . याचा ऐरोलीकडील भाग ते मुंब्रापर्यंतच टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित भागासाठी निधी मिळाल्याने आता या मार्गाला गती मिळणार असून या भागातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

advertisement

प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद

मेट्रो – 5 ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) – 1 हजार 309.30 कोटी

मेट्रो – 5 अ ( विस्तारित ) ( दुर्गाडी ते उल्हासनगर ) – 183.35कोटी

मेट्रो – 12 ( कल्याण ते तळोजा ) – 1हजार 54.54कोटी

मेट्रो – 14 ( कांजूरमार्ग – बदलापूर ) – 500कोटी

advertisement

कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल – 150 कोटी

कल्याण रिंग रोड – 600 कोटी

विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग – 200 कोटी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 ट्रॅक्टर उंबराची भाजी,गव्हाच्या चपात्या,102 वर्षांची महाप्रसादाची अनोखी परंपरा
सर्व पहा

ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा – 3) – 900 कोटी, या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Thane : कल्याण-ठाणेचा कायापालट होणार; उपमु्ख्यंत्री एकनाथ शिंदे यांच मोठे गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल