टँकरमधील तस्करीचा डाव फसला
गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा हा गुजरातकडे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रायगड पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, अपल पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल गायकवाड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी एक पथक तयार केले.
advertisement
या विशेष पथकाने कर्जत-मुरबाड आणि शहापूर राज्य महामार्गावर सापळा रचला आणि तपासणी सुरु केली. शनिवार रात्री साधारण 9 वाजता वारे गावच्या हद्दीत एक हॉटेल आहे त्याच्या समोर एक पाण्याचा टँकर संशयास्पदरीत्या आढळून आलेला असल्याने त्याची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना त्या टँकरमध्ये अनेक कप्पे तयार करुन विदेशी मद्यसाठी लपवून ठेवल्याचे दिसून आले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Crime News : गोव्याची दारू गुजरातला, तस्करांनी पुष्पा स्टाइलनं डोकं चालवलं,पण महाराष्ट्रात पोलिसांनी गेम केला
