उघडा दरवाजा पाहून गुन्हेगाराने गाठलं घर
राजू सलिम हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या काळात त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटे आणि सामानाची झडती घेत चोरट्याने सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
advertisement
सायंकाळी घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने सलिम यांना चोरी झाल्याचा संशय आला. तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घर सुरक्षित ठेवण्याबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
