जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत ते.
1) गोड पदार्थ : तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला गोड पदार्थांपासून लांब राहावं लागेल. कारण गोड पदार्थ हे तुमच्या वजन कमी करण्यातल्या प्रवासातला अडथळाच नाही तर तुमच्या आरोग्याचे शत्रू ठरू शकतात. गोड पदार्थात असलेल्या शर्करेमुळे कॅलरीज आणि वजन वाढण्याची भीती असते. त्यामुळे नाश्तात गोड पदार्थांऐवजी भरड धान्य, ओट्स यांचा समावेश करा.
advertisement
2) सरबत, कोल्ड ड्रिंक्स : कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स मग ते कोल्ड ड्रिंक्स, सरबत, एनर्जी ड्रिंक्स, असो की झीरो कॅलरी ड्रिंक्स. असे कार्बोनेटेड ड्रिंक्स प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्याऐवजी ते वाढेल. याशिवाय असे ड्रिंक्स विविध आजारांना निमंत्रण देतात.
3) फ्लेवर्ड ताक: ताक हे पचनासाठी चांगलं असलं असलं तरीही बाजारात टेट्रा पॅक मध्ये मिळणारं, फ्लेवर्ड ताक पिणं टाळा. कारण यात साखर आणि ते जास्त काळ टिकण्यासाठी त्या रसायनं (प्रिझव्हेटिव्हज्) घातली असल्याने ते तुमच्या आरोग्साठी धोक्याचं ठरू शकतं.
4) प्रोसेस्ड चीज : चीज, बटर, मेयोनिज अशा पदार्थांमध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं.मर्यादित स्वरूपातही असे पदार्थ खाणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे पदार्थ टाळावेच लागतील.
5) क्रिमी सलाड : सलाड हे आरोग्यासाठी फायद्याचं जरी असलं तरीही त्यावर चीज, मेयोनिज टाकून खाणं धोक्याचं ठरू शकतं. अशा डिझायनर सलाडमुळे तुमच्या शरीरात सोडियम आणि फॅट्सचं प्रमाण वाढून त्याचा थेट धोका तुमच्या यकृत आणि हृदयाला होऊ शकतो.
6) इन्स्टंट नूडल्स: चायनीज नूडल्स किंवा मैद्यापासून बनवलेली कोणतीही गोष्ट वजन कमी करण्याऐवजी ते वाढवण्यात मदत करतात. म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नुडल्स आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळा.
7) गोड दूध / लस्सी: बाजारात मिळणाऱ्या दुधात किंवा लस्सीमध्ये साखर असते. त्यामुळे या गोड पदार्थामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढण्याची भीती असते. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
8) बुफेमधलं जेवण: जेव्हा तुम्ही बुफेमध्ये जेवता, तेव्हा तुम्ही अजाणतेपणे खूप भरपूर खाता. याशिवाय अनेकदा तुम्ही उभं राहून खाता, त्यामुळे पचानाच्या समस्या निर्माण होऊन शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढू शकतं.
9) चिकन बिर्याणी: चिकन खाल्ल्याने वजन कमी होते असे म्हणतात पण बिर्याणी खाल्ल्याने वजन वाढतं. याचं कारण म्हणजे बिर्याणी बनवताना वापरलं जाणारं तेल आणि तूप. भलेही हे तूप शुद्ध असलं तरीही तेल, तूप एकत्र खाल्ल्याने शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढतं.
10) हाय कॅलरी फूडस:तुम्ही वजन कमी करता याचा अर्थ तुमच्या शरीरात असलेल्या कॅलरीज बर्न करता आहात. अशा स्थितीत जर तुम्ही हाय कॅलरी फूडस किंवा अन्न खात असाल तर पुन्हा त्या कॅलरीज तुमच्या शरीरात नव्याने तयार होणार आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रोटिन्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेऊन, कॅलरीयुक्त आहार टाळा.
आधी सांगितल्या प्रमाणे दर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त व्यायाम किंवा आहारच नाही तर पुरेशी झोपही आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ताणतणाव विरहीत असणं जास्त गरजेचं आहे.