Weight Loss beverages: ग्रीन टी, ब्लॅक कॉफी की ग्रीन कॉफी नेमकं काय प्यायल्याने होईल वजन कमी? जाणून घ्या तिघांचे फायदे

Last Updated:

Best Weight Loss beverages: काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीची जोरदार चर्चा झाली होती. यानंतर अनेक जण ब्लॅक कॉफीकडे वळले आता तर बाजारात ग्रीन कॉफी सुद्धा आलीये.जाणून घेऊयात ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी यापैकी वजन कमी करण्यात काय फायदेशीर ठरू शकतं

प्रतिकात्मक फोटो : ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी नेमकं कशाने होईल वजन कमी ?
प्रतिकात्मक फोटो : ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी नेमकं कशाने होईल वजन कमी ?
मुंबई: बदलेल्या जीवनशैलीमुळे सध्या अनेकजण त्रासलेले आहेत. सततचा ताण, जंकफूड यामुळे डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर अशा विविध समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतोय. वेळेच्या अभावामुळे अनेकांना वजन कमी करण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधावा लागतो. काही जण उपाशी राहतात तर काही जण फ्रुट डाएट करतात तर काही लिक्विड डाएट. मात्र यामुळे खरंच वजन कमी होतं का ? की आणखी काही त्रास मागे लागतात हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीची जोरदार चर्चा झाली होती. यानंतर अनेक जण ब्लॅक कॉफीकडे वळले आता तर बाजारात ग्रीन कॉफी सुद्धा आलीये.

जाणून घेऊयात ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी यापैकी वजन कमी करण्यात काय फायदेशीर ठरू शकतं

Best Weight Loss beverages: ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी नेमकं कशाने होईल वजन कमी?
advertisement
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स (कॅटेचिन्स) भरपूर असतात, जे मेटाबॉलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जाळण्यात मदत करतात. यात कॅफिनही असते जे उर्जेचा पुरवठा करते. कॅटेचिन्स आणि कॅफिनमुळे  भूक कमी  होते आणि पाण्यामुळे पोट भरलेलं वाटतं. ग्रीन टी पचनक्रियेला सुधारून पोटातला जडपणा कमी करते. पचन सुधारल्यावर पोट हलकं वाटतं.याशिवाय ग्रीन टीमध्ये दूध किंवा साखर नसल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत.
advertisement
Best Weight Loss beverages: ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी नेमकं कशाने होईल वजन कमी?
ब्लॅक कॉफीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे ती लो-कॅलोरी ड्रिंक आहे.त्यामुळे ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन वाढत नाही. कॅफेनमुळे मेटाबॉलिझम वाढून शरीरातली चरबी वेगाने जळायला मदत होते. कॅफेन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे उर्जेचा पुरवठा होतो आणि शारीरिक व मानसिक कार्यक्षमता सुधारते. कॅफेन मेंदूतील न्यूरोट्रांसमिटर्स सक्रिय ठेवते, ज्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.डिमेन्शिया, अल्झायमर, आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांचा धोका कमी होतो. ब्लॅक कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्स, हायड्रोक्सीकिनॅमिक अॅसिड्स, आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढतात.त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्लॅक कॉफी लिव्हरवर सकारात्मक परिणाम करते आणि लिव्हर सिरॉसिस, फॅटी लिव्हर, आणि कॅन्सरसारख्या समस्या होण्याचा धोका कमी करते. कॅफेनमुळे भूक नियंत्रणात राहते.
advertisement
Best Weight Loss beverages ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन कॉफी नेमकं कशाने होईल वजन कमी (4)
गेल्या काही वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी चर्चेत आहे. यामध्ये कॉफीच्या बिया भाजल्या जात नाहीत त्यामुळे त्यात असलेले क्लोरोजेनिक ॲसिड टिकून राहते जे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रीन कॉफीत चांगल्या प्रमाणात क्लोरोजेनिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. वजन कमी करण्यापेक्षा डायबिटीस कमी करण्यात ग्रीन कॉफी जास्त फायद्याची ठरते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss beverages: ग्रीन टी, ब्लॅक कॉफी की ग्रीन कॉफी नेमकं काय प्यायल्याने होईल वजन कमी? जाणून घ्या तिघांचे फायदे
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement