Walking Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज 1 तास करा ‘हा’ व्यायाम, एक महिन्यात 4 किलोने कमी होईल वजन
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of walking in Marathi: दररोज एक तास चालण्याने स्नायू आणि हाडं मजबूत होतात. याशिवाय मन आनंदी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक असणारी संप्रेरकं सुद्धा स्रवायला मदत होते. चालण्याने फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहायला मदत होते.
मुंबई : कोणत्याही व्यक्तीला आजारी न पडता फिट राहायचं असेल तर सकस, पोषक आहार घेण्याचा आणि व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चालणं हा सर्वांग सुंदर व्यायाम मानला जातो. चालण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी चालणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण चालण्याने फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहायला मदत होते. दररोज एक तास चालण्याने स्नायू आणि हाडं मजबूत होतात. याशिवाय मन आनंदी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक असणारी संप्रेरकं सुद्धा स्रवायला मदत होते. त्यामुळे चालण्याने, व्यायाम केल्याने मरगळ निघून जाऊन उत्साही वाटायला लागतं.
जाणून घेऊयात दररोज चालण्याचे फायदे
हृदयाचं आरोग्य सुधारतं:-
चालल्यामुळे शरीरातल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे फॅट्स आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. त्यामुळे रक्तप्रवाह कोणताही अडथळा न आल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्याचा थेट फायदा हृदयाला होऊन हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते.
डायबिटीसवर नियंत्रण:-
नियमित चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणानंतर चालल्यानंतर खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. त्यामुळे रक्तात साखरेची पातळी वाढत नाही. तुम्ही सकाळी जर 1 तास चालत असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या फायद्याचं आहेच. मात्र रात्रीच्या जेवणानंतर शतपावली म्हणून तुम्ही किमान 15-20 मिनीटे जरी चालतात तरी तुम्हाला त्याचे भरपूर फायदे होतील. रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीची सवय लावून घेतलीत तर तुम्ही डायबिटीसला दूर ठेवू शकता किंवा डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो.
advertisement

चालण्याने पचनक्रिया सुधारते :-
दररोज चालण्याने शरीरातली अतिरिक्त चरबी जळायला मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांवर अतिरिक्त ताण येत नाही. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यातही सुधारणा होतो.
advertisement
चांगली झोप येते :-
रात्री चालल्याने रक्तप्रवाह सुधारतो ज्याचा अप्रत्यक्ष फायदा हा मेंदूलाही होतो. त्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारून मेलाटोनिन हार्मोन स्रवायला मदत होते. ज्यामुळे चांगली झोप येऊ शकते.
चालताना टाळा 'या' चुका :-
advertisement
आहारतज्ञांच्या मते तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर तुम्ही किती वेळ चालता आहात त्यापेक्षा कसं चालता याला जास्त महत्त्व आहे. चालताना तुमच्या शरीराची स्थिती बरोबर नसेल, तर शरीरावर अतिरिक्त दबाव येतो. त्यामुळे पोटाची चरबी कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही चालतात तरी फायदा होत नाही. चालताना जर तुम्ही तुमचे डोकं खाली ठेवून किंवा तुमचे खांदे वाकवून चालत असाल तर ही चालण्याची चुकीची आणि अयोग्य पद्धत आहे. कारण यापद्धतीने चालताना पाठीचे आणि पोटाचे स्नायू पूर्णपणे सक्रिय नसतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होतच नाही. उलट पोक काढून चुकीच्या पद्धतीने चालताना स्नायू अखडून तुम्हाला पाठदुखी, किंवा हातापायांमध्ये पेटके येऊ शकतात. त्यामुळे चालताना, डोकं सरळ दिशेत ठेवून ताठ मानेने चालणं हे नेहमी फायद्याचं ठरतं. यामुळे पाठ, पोट आणि खांद्यांची व्यवस्थित हालचाल होते. शिवाय शरीरावर अतिरिक्त ताण न आल्याने पोटावरची चरबीही जळायला मदत होते.
advertisement
1 तास चालल्याने किती वजन कमी होऊ शकतं ?
चालण्याच्या सामान्य वेगाचा विचार केला तर साधारणपणे एका तासात 5 ते 6 किलोमीटर अंतर सहज कापणं शक्य होतं. यानुसार तुम्ही दिवसाला साधारण 300 ते 400 कॅलरीज बर्न करू शकता. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे महिनाभर चालतात तर तुम्ही सहजपणे 3 ते 4 किलोने वजन कमी करू शकता.
advertisement

सकस, पोषक आहारही महत्त्वाचा :
लक्षात घ्या, वजन कमी करण्यासाठी चालणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे तो सकस आणि पोषक आहार घेणं. जास्त फॅट्स आणि कॅलरीयुक्त आहार टाळून प्रोटिन्, व्हिटॅमिन्स असलेला आहार घेतला तर तो अधिक फायद्याचा ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज 1 तास करा ‘हा’ व्यायाम, एक महिन्यात 4 किलोने कमी होईल वजन