Weight loss Golden Rule: वजन कमी करायचं आहे? मग वापरा ‘हा’ गोल्डन रूल, 1महिन्यात 6 किलोने कमी होईल वजन
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Golden Rule for Weight loss in Marathi: तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर आम्ही सांगतो तो गोल्डन रूल वापरून पाहा. एका महिन्यात 6 ते 7 किलोच्या सरासरीने तुम्ही 3 महिन्यात तब्बल 20 किलोपर्यंत वजन घटवू शकता.
मुंबई: ओबेसिटी, स्थूलपणा किंवा 'लठ्ठपणा' ही आज भारतातील सर्वात मोठी आरोग्य समस्या झालीये. स्थूलपणामुळे फक्त तुमच्या व्यक्तीमत्त्वावरच विपरीत परिणाम होत नाही तर तुम्हाला डायबिटीस, ब्लडप्रेशर अशा आजारांचा सामानाही करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात तर काही जण तासंतास जीममध्ये वर्कआऊट करतात. काहींना यात यश मिळतं तर वजन कमी करण्यात काहींनाअपयश येतं. तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर आम्ही सांगतो तो गोल्डन रूल वापरून पाहा. एका महिन्यात 6 ते 7 किलोच्या सरासरीने तुम्ही 3 महिन्यात तब्बल 20 किलोपर्यंत वजन घटवू शकता.
डाएट आणि आहार यांची सांगड घाला.
जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा अनेकांकडून अनेक सल्ले ऐकायला मिळतात. यापैकी काही सल्ल्यांच्या निश्चित फायदा होतो. मात्र काही सल्ल्यामुळे नुकसानच होतं. जोपर्यंत संतुलित आहार आणि व्यायाम याची सांगड घातली जात नाही तोपर्यंत वजन कमी करणं शक्य होत नाही. काही प्रयत्नांनी सुरूवातीला 1-2 किलोने वजन कमी होऊ शकतं. मात्र हे तात्पुरतं असतं. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकत नाही. म्हणून अनेकदा आपल्याला असं ऐकायला मिळतं की जीम किंवा व्यायाम करणं सोडल्यानंतर वजन हे आधीपेक्षा जास्त वाढलं. त्यामुळे तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर डाएट आणि आहाराची सांगड घालणारा गोल्डन रूल फॉलो करा.
advertisement

advertisement
काय आहे हा गोल्डन रूल ?
आहार आणि पोषणतज्ञ असणाऱ्या रिद्धी यांनी सोशल मीडियावर या गोल्डन रूलची माहिती दिलीये. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हा गोल्डन रूल सांगितलाय. हा गोल्डन रूल फक्त आणि फक्त रात्रीच्या जेवणापुरता मर्यादीत आहे. रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी करणं महत्त्वाचं ठरतं. कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तुमची जेवणाची वेळ वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
advertisement
advertisement
वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टी महत्त्वाच्या

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस, पूरक आहारासोबत तुम्ही तणाव विरहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तणावमुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला वजन कमी करण्यात अडथळे येऊ शकतात. तणावमुक्त जीवनासाठी जशी शांत झोप महत्त्वाची आहे तशीच ही झोप वजन कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी तुमचे जेवण पूर्ण केल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास वेळ मिळतो आणि झोपताना अस्वस्थता, अपचन किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या वेळी रात्रीचे जेवण थेट तुमच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम करतं. त्यामुळे तुम्ही जर रात्रीचं जेवण योग्य वेळी केलं तर अन्नपचायला मदत होते ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो.जर तुम्हाला झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी जेवण करणं शक्य नसेल तर, किमान जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या शतपावली किंवा जेवणानंतरच्या चालण्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight loss Golden Rule: वजन कमी करायचं आहे? मग वापरा ‘हा’ गोल्डन रूल, 1महिन्यात 6 किलोने कमी होईल वजन