30-30-30 Diet Rule: वजन कमी करायचं आहे? मग उपयोगात आणा 30-30-30 डाएट प्लॅन, जाणून घ्या नेमका आहे तरी काय 30-30-30 रूल?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of 30-30-30 diet plan in Marathi: सध्या वजन कमी करण्यासाठी 30-30-30 डाएट प्लॅन हा चर्चेत आहे. जाणून घेऊयात नेमका हा डाएट प्लॅन आहे तरी काय आणि काय आहेत त्याचे फायदे.
मुंबई : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. एखादी गोष्टी अगदी काही क्षणात वायरल होऊ शकतं. अशीच एक गोष्ट सध्या वायरल होते आहे, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी 30-30-30 डाएट प्लॅन किंवा 30-30-30 डाएट रूल. मुळातच ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी हा प्लॅन अमलात आणला तर त्यांचं फक्त वजनच कमी होणार नाही तर त्यांना विविध आरोग्यादायी फायदे सुद्धा होतील.
जाणून घेऊयात सोशल मीडियावर वायरल होत असलेला हा 30-30-30 डाएट प्लॅन नेमका आहे तरी काय ?
तुम्ही वजन कमी करण्यासाठी खरंच जागरूक असाल तर तुम्हाला सकाळी लवकर उठून या 30-30-30 डाएट प्लॅन किंवा 30-30-30 या नियमांवर काम करावं लागेल. सकाळी उठल्याच्या 30 मिनिटांच्या आत तुम्हाला प्रोटीनयुक्त नाश्ता करावा लागेल. नाश्त्यामध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता किंवा ओट्स,क्विनोआ, चिया सीडस् खाऊ किंवा अन्य प्रोटिनयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करू शकता. नाश्त्याच्या 30 मिनिटांच्या आत तुम्हाला 30 मिनिटांसाठी व्यायामाला सुरूवात करावी लागेल. आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य नेहमी म्हणतात की ,जेवणानंतर लगेच व्यायाम करायचा नसतो मग इथे खाल्ल्या-खाल्ल्या लगेच कसा व्यायाम करायचा ? असा प्रश्न पडू शकतो. तुम्ही जर नीट वाचलं असेल तर तुम्हाला 30 मिनिटांच्या आत व्यायाम सुरू करायचा आहे. मुख्य म्हणजे सुरूवातीला हलका व्यायाम करून मग तुम्ही व्यायामाची तीव्रता वाढवायची आहे. याशिवाय असंही म्हटलं जातं की, काही खाल्ल्यानंतर शतपावली घालावी. त्याच पद्धतीने नाश्ता केल्यानंतर जर तुम्ही 20 मिनिटांनी चालायला सुरूवात केली आणि त्यानंतर व्यायाम केला तर तुमच्या शरीराला होऊ फायदा शकतो.
advertisement
30-30-30 प्लॅनमुळे वजन कमी होतं का?
आहारतज्ज्ञांचं असं मत आहे की, हा प्लॅन फॉलो करत अनेकांना फायदा झालाय त्यांचं वजन कमी झालंय. मात्र हे शास्त्रीयदृष्ठ्या सिद्ध झालेलं नाहीये. कारण आजपर्यंत याबाबतीत कोणतंही संशोधन झालेलं नाही. मात्र या डाएट प्लॅनचे काही फायदे नक्कीच आहेत. उदा. सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता केल्यास फायदा होता. कारण प्रोटीन्स पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भूक लागते. त्यामुळे अतिरिक्त खाणं टाळलं जातं ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.
advertisement
वजन कमी होण्यासोबत गंभीर आजार होतात दूर
संशोधनातून असंही सिद्ध झालंय की, प्रथिनंयुक्त नाश्ता केल्याने रक्तातील साखर कमी होते. त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायाला मदत होते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. याशिवाय रक्तात असलेलं चांगलं कोलेस्टेरॉल वाढायला मदत होते. 30-30-30 डाएट प्लॅनमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त लवकर उठून नाश्ता करणं नाही तर व्यायाम करणं देखील महत्त्वाचं आहे. यामुळे जास्त कॅलरीज बर्न होऊन वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि तुम्ही तणावमुक्त असणं सुद्धा महत्त्वाचं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
30-30-30 Diet Rule: वजन कमी करायचं आहे? मग उपयोगात आणा 30-30-30 डाएट प्लॅन, जाणून घ्या नेमका आहे तरी काय 30-30-30 रूल?