पुणे : आईस्क्रीम हा तसा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. ऋतू कुठला ही असला तरी आईस्क्रीम हे चविणे खाल्लं जातं. सध्या उन्हाळाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे गर्मी ही वाढतंच चालली आहे. यामुळेच शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकांची पावले आपोआप आईस्क्रीम खाण्याकडे वळत आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला पुण्यातील अश्या एका ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहोत जिथं तुम्हाला प्युअर दुधापासून बनवलेली आईस्क्रीम खायला मिळेल.
advertisement
कोण कोणते मिळतात प्रकार?
पुण्यातील झेड ब्रिज जवळ असलेलं वृंदावन आईस्क्रीम इथे प्युअर दुधापासून बनवलेली आईस्क्रीम खायला मिळते. वृंदावन आईस्क्रीमचे दुकानाचे मालक कांतीप्रसाद शर्मा आहेत. वृंदावन आईस्क्रीम दुकान 80 वर्ष जुनं आहे. या ठिकाणी आईस्क्रीमचे 14 प्रकार हे खायला मिळतात. यामध्ये मलई, पिस्ता, रासबेरी, मिक्स, मँगो, चिकू, चॉकलेट, टूटी फ्रुटी, अंजीर, गुलकंद, केशरपीस्ता, सीताफळ प्रकार मिळतात.
उन्हाळ्यात बर्फ टाकून प्या चहा, फक्त 2 मिनिटांत तयार होते आईस टी
काय आहे किंमत?
आईस्क्रीम बनवताना कुठल्याही इसेन्सचा वापर हा आमच्याकडे केला जात नाही. प्युअर दूधापासून आईस्क्रीम हे बनवलं जातं. यामध्ये त्या त्या फ्लेवरच्या फळाचा गर काढून त्यापासून आईस्क्रीम बनवली जाते. 40 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत ही आईस्क्रीम मिळते, अशी माहिती वृंदावन आईस्क्रीम दुकानाचे मालक कांतीप्रसाद शर्मा यांनी दिली आहे.