TRENDING:

Relationship Tips : हनीमूनच्या वेळी आवर्जुन करा 'ही' 5 कामं, दोघांमध्ये निर्माण होईल खास नातं 

Last Updated:

हनीमून हा एक अनोखा काळ असतो, ज्यामुळे जोडप्यांना एकमेकांच्या सोबत अधिक वेळ घालवण्याची आणि भावनिक बंध तयार करण्याची संधी मिळते. या काळात मोबाईल आणि इतर व्यत्ययांपासून दूर राहून संवाद साधणं आणि एकमेकांसोबत आठवणी तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Love Marriage असो वा Arranged Marriage... नवविवाहित जोडपे लग्नानंतर आपल्‍या जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ आणि प्रेमळ बनवण्‍यासाठी हनीमूनला जातात. हनीमूनला जाणाऱ्या जोडप्यांसाठी हा एक खास आणि अविस्मरणीय काळ असतो, जो त्‍यांना एकमेकांसोबत प्रेम आणि आनंद अनुभवण्‍याची संधी देतो, तसेच त्‍यांचे नाते भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवू शकतो.
News18
News18
advertisement

हनीमून हा असा काळ असतो, जेंव्‍हा तुम्‍ही आपल्‍या जोडीदाराला अधिक जवळून ओळखता. अशा स्थितीत, हनीमूनला जात असताना, काही गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे, जे तुमचे नाते अधिक मजबूत करू शकतात.

एकमेकांसोबत क्‍वॉलिटी टाइम घालवा : आजकाल मोबाईल फोन किंवा गॅजेट्सपासून दूर राहणे खूप कठीण आहे. पण हनीमून दरम्यान, जोडप्यांनी आपले मोबाईल फोन आणि इतर बाह्य लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. बऱ्याचदा तुम्हाला कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत आणि नवविवाहित जोडपे जीवनात व्यस्त होतात. पण हनीमून ही जीवनाशी संबंधित मनमोकळ्या आणि महत्त्वाच्या गप्पा मारण्याची एक उत्तम संधी आहे.

advertisement

मनमोकळेपणाने बोला आणि भावनिक बंध तयार करा : हनीमून तुमच्या प्रेमाची कहाणी सांगेल. पण या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जो भावनिक बंध तयार कराल, तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता तुमचे विचार आणि भावना व्यक्त करण्याची ही वेळ आहे.

सामूहिक अनुभव तयार करा : लग्नापूर्वीचे तुमचे जीवनातील अनुभव फक्त तुमचे असतात. पण हनीमून हा एक काळ आहे, जो तुम्हा दोघांचा एकमेकांसोबतचा पहिला अनुभव असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचा एकत्र विचार कराल, तेव्हा हा काळ सर्वात सुंदर असेल. त्यामुळे हनीमूनमध्ये, ती साहसी ॲक्टिव्हिटी असो किंवा नवीन ठिकाणी एकत्र भेट देणे असो, तुम्ही एकत्र आठवणी नक्की तयार करा.

advertisement

समजून घेण्याची संधी : कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे वर्तन वेगळे असते. पण लक्षात ठेवा, हनीमून ही तुमच्या जोडीदाराचे खरे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याची सर्वोत्तम संधी आहे. हनीमून दरम्यान, प्रत्येक जोडप्यात काही तणाव किंवा छोटे मतभेद असू शकतात. ही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याची उत्तम वेळ आहे.

काहीतरी खास करा : हनीमूनला बाहेर जाणे, हॉटेलमध्ये राहणे किंवा प्रवास करणे हे सर्व तुमच्या योजनेचा भाग आहे. पण या प्रसंगी काहीतरी खास करण्याची संधी गमावू नका हे लक्षात ठेवा. ती एक रोमँटिक डिनर डेट असो, एकमेकांसाठी एक छोटासा सरप्राईज असो किंवा सूर्यास्ताच्या वेळी हातात हात घालून सुंदर ठिकाणी बसणे असो. हे छोटे क्षण त्यांचे नाते भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करू शकतात.

advertisement

हे ही वाचा : रिलेशनशिप नवा ट्रेंड! ज्यात ना 7 जन्माचं वचन, ना सोबत राहण्याचं बंधन... डिप्रेशनचं हे कारण आहे का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

हे ही वाचा : Chanakya Niti : शारीरिक संबंधांनंतर कपलने 'हे' करायलाच हवं

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Relationship Tips : हनीमूनच्या वेळी आवर्जुन करा 'ही' 5 कामं, दोघांमध्ये निर्माण होईल खास नातं 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल