ही पद्धत 5:2 डायटिंगची आहे. डाएटिंग प्रत्येकाला आवडेलच असं नाही पण डायटिंगची 5:2 पद्धत सोपी आहे आणि त्यात तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी खाण्याची संधीही मिळते. वजन कमी करण्यासाठी काहीजण Intermittent fasting करतात. 5:2 या पद्धतीमध्ये तुम्ही 5 दिवस नेहमीसारखं जेवू शकता आणि 2 दिवस उपवास करू शकता.. तुम्ही तुमच्या 5 दिवसात नेहमीसारखं खा पण उरलेल्या 2 दिवसात तुम्हाला कॅलरीज लक्षात घेऊन खावं लागेल, उपवासाच्या दिवशी फक्त एक किंवा दोनदाच खाल्लं जातं, तीच पद्धत इकडे वापरायची.
advertisement
Muscle Recovery : स्नायू लवकर बरे होण्यासाठीचे उपाय...वेदना, थकवा करता येईल दूर
उपवासाच्या दोन दिवसांमध्ये कमी उष्मांक असलेल्या परंतु पोषक पदार्थ खाण्याकडे लक्ष द्या. या पदार्थांमध्ये फायबर म्हणजे तंतूमयता जास्त असली पाहिजे. जेणेकरून पचन चांगलं होतं आणि पोट जास्त काळ भरलेलं वाटतं.
जेव्हा तुम्ही उपवास करत असाल किंवा कमी खात असाल तेव्हा 2 दिवसांमध्ये, अल्कोहोल, कॉफी, साखर, मलई, ब्रेड, भात, बटाटे, पास्ता आणि बटर न खाण्याचा सल्ला दिला जातो. कॅलरी लक्षात ठेवून, तुम्ही आठवड्यातून 2 दिवस 1, 2 किंवा 3 वेळा खाऊ शकता.
Cholesterol control - कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...
5 दिवसात काय खावं ?
5:2 पद्धतीमध्ये, 5 दिवस नेहमीसारखं खा, या दिवसांत रोजच्या गरजेनुसार कॅलरीज घेतल्या जातात. आहारात फळं, भाज्या, प्रथिनं, कडधान्यं, सुका मेवा, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि हेल्दी फॅटचा समावेश होतो.
हा डाएटिंग प्रकार सोपा आहे आणि रोज काय खावं आणि काय खाऊ नये याचा विचार करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अन्न खाऊ शकता. Intermittent fastingच्या या प्रकाराची शरीराला सहज सवय होते.
यामुळे आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं. जळजळ आणि सांधेदुखीचा त्रास होत नाही. या डाएटिंगचा एक तोटा असा आहे की तुम्ही तुमच्या उपवासाच्या 2 दिवसात चुकून जास्त खाऊ शकता. योग्य आहाराची निवड केली नाही तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. या डाएटिंगमध्ये उपवासाच्या दिवसात प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स, सोडा, तळलेले पदार्थ खाऊ नयेत याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.