advertisement

भाविकांसाठी नवी सेवा, पोस्टाकडून गंगाजल आणि महाप्रसाद मिळणार घरपोच, ऑर्डर कशी कराल?

Last Updated:

टपाल विभागाने आता व्यावसायिक वृद्धीसाठी गंगेचे पवित्र जल घरपोच उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगानंतर आता देशातील आणि  महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा पवित्र प्रसादही घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : भारतीय टपाल विभागाची सेवा केवळ टपाल किंवा पार्सलपुरती मर्यादित न राहता लोकाभिमुख होत आहे. टपाल विभागाने आता व्यावसायिक वृद्धीसाठी गंगेचे पवित्र जल घरपोच उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगानंतर आता देशातील आणि  महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा पवित्र प्रसादही घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेचे पवित्र जल आणि प्रसाद घरबसल्या ऑनलाइन मागवता येणार आहे.
ऑर्डर कशी करावी?
ऑर्डर ही ऑनलाइन करता येणार आहे. भारतीय टपाल विभागाच्या  India post.gov.in या संकेतस्थळावर रिटेल सव्हिस या मेनूवर गंगाजल आणि प्रसाद या पर्यायांवर इच्छुक नागरिक प्रसाद आणि गंगाजल ऑर्डर करू शकतात. लॉगिननंतर राज्यानुसार देवस्थानांची यादी व प्रसादाचे शुल्क आणि पोस्टाच्या शुल्काची माहिती मिळते. त्यानुसार संबंधित इच्छुक नागरिक नोंदणी व मागणी करू शकतात.
advertisement
महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणचा महाप्रसाद मागवता येणार?
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांसह देशातील विविध देवस्थानांचा प्रसाद पोस्टाद्वारे घरपोहोच उपलब्ध करून देण्याची ही सेवा योजना आहे. भीमाशंकर, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, शनि शिंगणापूर, मोहटादेवी, आळंदी, जेजुरी, पाली येथील बल्लाळेश्वर व अन्य तीर्थक्षेत्रांचा तसेच आंध्रातील तिरुपती, गुजरातमधील सोरटी सोमनाथ, उत्तरेतील काशी विश्वनाथ, राजस्थानमधील श्री बाबा रामदेवजी देवस्थानांचा प्रसाद पोस्टाद्वारे भाविकांना मागविता येणार आहे. गंगाजलसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क व मागणी केल्यानंतर सुविधेनुसार ठरावीक कालावधीमध्ये गंगाजल उपलब्ध होते. 250 मिलिलिटरची गंगाजल बाटलीची किंमत 30 रुपये आहे. ऑनलाइन मागविल्यास पोस्टेज शुल्कासह 121 रुपये लागतात.
advertisement
गंगाजल सेवा कुठे?
आपापल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आणि इतरही पोस्ट कार्यालयात तसेच मुख्य डाकघर येथे गंगाजल उपलब्ध करून दिली जाते.
पोस्टाकडून गंगाजल घरपोच मिळणार 
भारतीय संस्कृतीत धार्मिक विधींसाठी गंगाजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु अनेकदा अडचणींमुळे गंगा यमुनोत्री अशा हिमालयातील पवित्र ठिकाणी भेट देऊ शकत नाहीत. अशा ग्राहकांसाठी टपाल विभागाने पोस्टाच्या कार्यालयात गंगाजल उपलब्ध करून दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
भाविकांसाठी नवी सेवा, पोस्टाकडून गंगाजल आणि महाप्रसाद मिळणार घरपोच, ऑर्डर कशी कराल?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement