advertisement

Honda Shine 100 की Bajaj Platina 100; किंमत, फीचर्ससह मायलेजमध्ये कोण बेस्ट?

Last Updated:

Honda Shine 100 vs Bajaj Platina 100: तुम्हाला Honda Shine 100 आणि Bajaj Platina 100 मधून एकादी गाडी निवडायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत योग्य ठरु शकते. चला पाहूया तुमच्यासाठी कोणती बाईक ही बेस्ट ठरेल.

ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
Honda Shine 100 vs Bajaj Platina 100: भारतात टू-व्हीलर ही सर्वात जास्त लोक वापरतात. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय टू-व्हिलर मार्केटमध्ये 100cc सेगमेंटची कम्प्यूटर बाईक्समध्ये Honda Shine 100 आणि Bajaj Platina 100 दोन प्रसिद्ध ऑप्शन आहेत. या दोन्ही बाईक्स डेली यूज, फ्यूल एफिशिएन्सी आणि परवडणाऱ्या किंमतीसाठी ओळखल्या जातात. Honda Shine 100 आपल्या विश्वसनीयता आणि चांगल्या राइडसाठी प्रसिद्ध आहे. तर Bajaj Platina 100 जास्त मायलेज आणि चांगल्या सस्पेंशनसाठी ओळखली जाते.
किंमतीच्या बाबतीत Honda Shine 100 थोडी जास्त परवडणारी आहे. याची एक्स-शोरुम किंमत जवळपास 65,557 रुपये आहे. तर Bajaj Platina 100 ची किंमत 65,897 रुपयांपासून सुरु होते. तुम्हाला या दोन्हीमधून एक निवडायची असेल आणि तुम्ही कंफ्यूज असाल तर ही माहिती तुम्हाला खुप फायदेशीर ठरु शकते. चला या दोन्ही बाईक्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
डिझाइनमध्ये कोणते चांगले आहे?
Honda Shine 100 ची डिझाइन आधुनिक आणि स्टायलिश आहे. त्यात स्लिम फ्युएल टँक, ग्राफिक्ससह बॉडी पॅनेल आणि क्रोम अॅक्सेंट आहेत. ते पाच कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे: लाल, निळा आणि काळा, ज्यामुळे ते तरुण रायडर्ससाठी आकर्षक बनते. त्याचे वजन 99 किलो आहे, ज्यामुळे ते हलके आणि सहज हाताळता येते.
advertisement
तसंच Bajaj Platina 100 ची डिझाइन क्लासिक आहे. यामध्ये लांब सीट, गोल्डन सस्पेंशन आणि LED DRLs चा समावेश आहे. ही 4 कलर ऑप्शन्समध्ये येते. याचं वजन 117 KG आहे जे थोडं जड आहे. दोन्हीमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत.
फीचर्समध्ये कोण भारी?
फीचर्सच्या हिशोबाने Bajaj Platina 100 सर्वात पुढे आहे. यामध्ये अडव्हान्सड कॉम्फोर्टेक टेक्नॉलॉजी, लांब आणि सॉफ्ट सीट, इलेक्ट्रिक-स्टार्ट (बटणाने स्टार्ट) LED DRL,नवीन रियर-व्ह्यू मिरर्स आणि वाइडर रबर फुटपॅड्स आहेत. Honda Shine 100 मध्ये बेसिक फीचर्स जसं की, कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS),सायलेंट स्टार्ट आणि सिंपल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहेत. दोन्हीमध्ये ड्रम ब्रेक्स आहेत. मात्र Bajaj मध्ये लाँग सस्पेशन चांगलं कम्फर्ट देते.
advertisement
इंजिन आणि मायलेज 
Honda Shine 100 मध्ये 98.98 cc चं 4-स्ट्रोक SI इंजन आहे. जे 7.28 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. हे एयर-कूल्ड आहे आणि फ्यूल इंजेक्शन सिस्टमसह येते. जे चांगला परफॉर्मेंस आणि कमी एमीशन करते. Bajaj Platina 100 मध्ये 102 cc चा DTS-i (डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन) इंजिन आहे. जे 7.79 bhp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क  देते. प्लॅटीना 100 चा क्लेम्ड मायलेज 70 KMPL च्या जवळपास आहे. तसंच शाइन 100 ला एक लिटर पेट्रोलमध्ये 65 KM पर्यंत चालवलं जाऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Honda Shine 100 की Bajaj Platina 100; किंमत, फीचर्ससह मायलेजमध्ये कोण बेस्ट?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement