Android मध्ये Apple AirDrop कसं वापरायचं? 99% लोकांना ही ट्रिक माहिती नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
iPhone युजर्ससाठीAirDrop हे वरदान आहे, ज्यामुळे काही सेकंदात मोठ्या फाईल्स शेअर होतं. पण आता अँड्रॉइड युजर्सनाही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता गुगल आणि ॲपल यांच्यातील डिजिटल भिंत कोसळली आहे आणि फाईल शेअरिंगचा अनुभव आता पूर्णपणे बदलला आहे.
मुंबई : मित्रांसोबत फिरायला गेल्यावर आपण शेकडो फोटो आणि व्हिडिओ काढतो. पण जेव्हा ते फोटो शेअर करण्याची वेळ येते, तेव्हा खरी कसरत सुरू होते. जर समोरच्याकडे iPhone असेल आणि तुमच्याकडे Android, तर मग सुरू होतो व्हॉट्सॲपवर डॉक्युमेंट करून पाठव किंवा गुगल ड्राइव्हवर अपलोड कर अशी खुप मोठी प्रोसेस. यामुळे कधी फोटो खूप उशीरा येतात तर कधी फोटो येतच नाही. या प्रक्रियेत अनेकदा फोटोची क्वालिटी खराब होते किंवा इंटरनेटअभावी फाईल्स वेळेवर पोहोचत नाहीत.
iPhone युजर्ससाठीAirDrop हे वरदान आहे, ज्यामुळे काही सेकंदात मोठ्या फाईल्स शेअर होतं. पण आता अँड्रॉइड युजर्सनाही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता गुगल आणि ॲपल यांच्यातील डिजिटल भिंत कोसळली आहे आणि फाईल शेअरिंगचा अनुभव आता पूर्णपणे बदलला आहे.
आता Android वरून iPhone ला फाईल्स पाठवणं झालं 'क्विक' कसं करायचं आणि काय आहे प्रोसेस लगेच समजून घ्या.
advertisement
नव्या अपडेटनुसार, आता अँड्रॉइड युजर्स कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय (उदा. ShareIt किंवा जेंडर) थेट आयफोनवर फाईल्स पाठवू शकतात. हे नेमकं कसं काम करतं, ते जाणून घेऊया:
पहिली पायरी : ज्या आयफोनवर फाईल घ्यायची आहे, त्यातील एअरड्रॉप सेटिंगमध्ये जाऊन Everyone for 10 Minutes हा मोड ऑन करा.
दुसरी पायरी : तुमच्या अँड्रॉइड फोनमधील क्विक शेअर ओपन करा. तिथे तुम्हाला जवळच असलेला तो ॲपल डिव्हाइस दिसेल.
advertisement
तिसरी पायरी: फाईल सिलेक्ट करा आणि समोरच्या डिव्हाइसवर क्लिक करा. क्षणार्धात तुमची फाईल ट्रान्सफर होईल.
हे तंत्रज्ञान काम कसं करतं?
हे नवीन फिचर ब्लूटूथ आणि वाय-फाय यांच्या संयोजनावर आधारित आहे.
1. सुरुवातीला ब्लूटूथच्या मदतीने दोन्ही डिव्हाइसेस एकमेकांना ओळखतात.
2. एकदा ओळख पटली की, वाय-फायद्वारे पिअर-टू-पिअर कनेक्शन तयार होतं.
3. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यासाठी तुम्हाला इंटरनेट किंवा कोणत्याही सर्व्हरची गरज लागत नाही. डेटा थेट एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये जातो.
advertisement
अनेकांना वाटतं की अशा प्रकारे फाईल्स शेअर करणं सुरक्षित आहे का?
कंपन्यांच्या दाव्यानुसार, हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आहे. फाईल ट्रान्सफर दरम्यान तुमचा डेटा एन्क्रिप्टेड असतो. तसेच, जोपर्यंत दोन्ही बाजूने 'कन्फर्मेशन' दिलं जात नाही, तोपर्यंत फाईल सेंड किंवा रिसीव्ह होत नाही. तुमच्या फाईल्स कोणत्याही सर्व्हरवर स्टोअर केल्या जात नाहीत, त्यामुळे प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेतली जाते.
advertisement
आता फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट डेटा खर्च करण्याची किंवा जाहिरातींनी भरलेली ॲप्स वापरण्याची गरज नाही. ॲपल आणि अँड्रॉइडमधील हे नवं मैत्रीपूर्ण फिचर तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 10:33 PM IST









