Muscle Recovery : स्नायू लवकर बरे होण्यासाठीचे उपाय...वेदना, थकवा करता येईल दूर

Last Updated:

व्यायामादरम्यान एखादी दुखापत झाली तर स्नायूंची दुरुस्ती आणि स्नायूंना परत ताकद मिळण्यासाठी वेळ लागतो. अन्यथा स्नायूंना थकवा येऊ शकतो, पाहूयात स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीचे उपाय

News18
News18
मुंबई : व्यायामादरम्यान एखादी दुखापत झाली तर स्नायूंची दुरुस्ती आणि स्नायूंना परत ताकद मिळण्यासाठी वेळ लागतो. अन्यथा स्नायूंना थकवा येऊ शकतो, ज्यामुळे दुखापत होऊ शकते, कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि दीर्घकालीन वेदना होऊ शकतात. स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी वैळ लागतो.
प्रथिनांचं सेवन वाढवा -
स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि बांधणीसाठी प्रथिनं सर्वात महत्वाचा पोषक घटक आहे. व्यायामानंतर प्रथिनांचं सेवन केल्यानं नवीन स्नायू तयार होण्यास मदत होते. अंडी, दूध, दही, चीज आणि चिकन यांसारख्या पदार्थांमधून तुम्हाला प्रथिनं मिळू शकतात. तसंच प्रोटीन शेक हा देखील चांगला पर्याय असू शकतो.
advertisement
हायड्रेशनची पातळी राखणं गरजेचं -
व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतर शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि वेदना जाणवू शकतात. त्यामुळे दररोज 2-3 लिटर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय देखील उपयुक्त ठरू शकतात.
स्ट्रेचिंग आणि योगासनं करा -
वर्कआउटनंतर हलकं स्ट्रेचिंग स्नायूंना लवचिक बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे स्नायूंचा ताण आणि दुखापतीचा धोका कमी होतो. योग आणि ध्यानामुळे शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे स्नायू रिकव्हर होण्यास मदत होते.
advertisement
नियमित मालिश -
मसाज हा स्नायूंचा थकवा दूर करण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
चांगली झोप -
पुरेशी आणि गाढ झोप ही स्नायूंच्या रिकव्हरीसाठी सर्वात महत्वाची असते. झोपेच्या‌ वेळेत शरीर स्वतःला दुरुस्त करतं आणि नवीन स्नायू तयार करण्यास मदत करतं. स्नायूंना पुरेसा वेळ मिळावा म्हणून दररोज ७-८ तासांची झोप आवश्यक असते.
advertisement
अँटिऑक्सिडंट समृद्ध आहार -
फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे स्नायूंवरची सूज कमी करण्यासाठी मदत करतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, पालक आणि गाजर यांसारखे पदार्थ या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकतात.
बर्फ आणि उष्णता उपचार -
व्यायामानंतर थंड किंवा गरम पाण्यानं हलका मसाज केल्यामुळे स्नायू दुखणं आणि सूज कमी केली जाऊ शकते. बर्फामुळे सूज कमी होऊ शकते, तर उष्मा थेरपीमुळे रक्त प्रवाह सुधारण्यासाठी उपयोग होतो. या दोन्ही तंत्रांचा योग्य वापर स्नायूंसाठी उपयुक्त ठरू शकतो.
advertisement
ध्यान आणि मानसिक विश्रांती -
मानसिक ताणामुळे शरीरावरही फरक पडतो. ध्यान आणि प्राणायाम यामुळे स्नायूंमध्ये सुधारणा होते. हे शरीर आणि मेंदू संतुलित ठेवण्यासाठी आणि तुम्हाला ताजंतवानं वाटण्यास मदत करतं.
स्नायूंसाठी, प्रथिनांचं सेवन, हायड्रेशन, चांगली झोप आणि योग्य व्यायाम यासारखे सोपे उपाय खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही या टिप्स तुमच्या दिनक्रमात समाविष्ट केल्या तर स्नायू दुखणं आणि थकवा कमी होईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Muscle Recovery : स्नायू लवकर बरे होण्यासाठीचे उपाय...वेदना, थकवा करता येईल दूर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement