advertisement

Pune: Thar ला घासला अन् पुढच्या 3 सेकंदात 5 जणांना चिरडलं, पुण्यातील मुळशीमधला VIDEO

Last Updated:

दुपारच्या सुमारास एका नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने 5 वाहनांना उडवलं. रिक्षा, कारसह दोन दुचाकींना टेम्पोनं जोराची धडक दिली.

News18
News18
मुळशी:  पुण्यात नवले पुलावर अपघात घडण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. अशातच आता मुळशीमध्ये लवळे फाटा इथं एका भरधाव ट्रॅकने ५ वाहनांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मुळशी इथं लवळे फाटा इथं 11 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.  दुपारच्या सुमारास एका नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने 5 वाहनांना उडवलं. आधी या ट्रकने एका महिंद्रा थारला घासला त्यानंतर समोर येईल त्या वाहनाला धडक दिली.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, भरधाव आयशर ट्रॅक वेगात आला आणि समोर येईल त्या वाहनांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, समोरील दुचाकीस्वारांना समजण्याआधीच ट्र्क चिरडून पुढे गेला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडून तसाच पुढे निघून देला.
advertisement
या अपघातात  1 दुचाकीस्वाराच्या पायावरून चाकं गेलं असून तो गंभीर जखमी झाला आहे. तर इतर 4 ते 5 जण किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले आहे. जखमी दुचाकीस्वारांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर धडक बसलेल्या वाहनांचंही यात मोठं नुकसान झालं आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयशर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  आयशर ट्रकचं ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  आता या घटनेचा थरकाप उडवणारा cctv समोर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: Thar ला घासला अन् पुढच्या 3 सेकंदात 5 जणांना चिरडलं, पुण्यातील मुळशीमधला VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement