advertisement

लेकीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळाली सासू, पण... आता कथेमध्ये आलाय असा ट्विस्ट की ऐकून पोलीसही चक्रावले

Last Updated:

लेकीच्या लग्नाची तारीख ठरली होती 16 एप्रिल 2025. घरात दागदागिने आले होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती. पण लग्नाला अवघे 12 दिवस शिल्लक असताना घरातून लेकीची आई 'अनिता' गायब झाली.

जावयासोबत पळाली सासू
जावयासोबत पळाली सासू
मुंबई : नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आदर असावा असं आपण मानतो. पण कधीकधी वास्तवात अशा काही घटना घडतात की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. 'नात्याची विण' जेव्हा स्वार्थासाठी किंवा अनैतिक ओढीपोटी विखुरली जाते, तेव्हा समाजात त्याची मोठी चर्चा होते. सध्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधून समोर आलेली एक घटना एखाद्या फिल्मी स्क्रीप्टपेक्षा कमी नाही. जिथे एका आईने आपल्याच मुलीचे घर मोडले आणि आता त्याच कथेत असा काही 'यू-टर्न' आला आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
ही गोष्ट सुरू होते अलिगडमधील मडराक भागातून. एका घरात लग्नाची लगबग सुरू होती. लेकीच्या लग्नाची तारीख ठरली होती 16 एप्रिल 2025. घरात दागदागिने आले होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती. पण लग्नाला अवघे 12 दिवस शिल्लक असताना घरातून लेकीची आई 'अनिता' गायब झाली. धक्कादायक बाब म्हणजे, ती कुणा परक्यासोबत नाही, तर ज्याच्याशी मुलीचं लग्न होणार होतं, त्या होणाऱ्या जावयासोबत म्हणजेच 'राहुल'सोबत पळून गेली.
advertisement
परिजनांच्या दाव्यानुसार, अनिता आणि राहुल यांच्यात आधीपासूनच फोनवर बोलणं सुरू होतं. दोघांच्या प्रेमाची चर्चा घरात सुरू झाल्यावर विरोधही झाला, पण प्रेमाची ही धून काही थांबली नाही. एप्रिल 2025 च्या सुरुवातीला अनिताने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेतले आणि राहुलसोबत संसार थाटण्यासाठी घर सोडलं. पोलीस तक्रारीनंतर जेव्हा दोघे सापडले, तेव्हा दोघेही सज्ञान असल्याने अनिताने राहुलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही बिहारमधील सीतामढी येथे जाऊन राहू लागले.
advertisement
आता कथेत आलाय नवा 'व्हिलन'
हे प्रकरण आता शांत झालंय असं वाटत असतानाच राहुलने अलिगड गाठून पोलिसांत एक नवीन तक्रार दिली आहे, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुलच्या म्हणण्यानुसार, त्याला सासरी सोडून पळून आलेली अनिता आता त्यालाही सोडून तिच्या स्वतःच्या मेव्हण्यासोबत फरार झाली आहे. राहुलने आरोप केला आहे की, अनिता त्याच्याकडून 2 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन 'देवेन्द्र' नावाच्या व्यक्तीसोबत (तिचा मेव्हणा) निघून गेली आहे. ज्या राहुलसाठी अनिताने आपल्या मुलीचं भविष्य धुळीस मिळवलं, आता त्याच राहुलला तिने दुसऱ्या व्यक्तीसाठी सोडलं आहे.
advertisement
कायदेशीर पेच आणि चर्चा
राहुलने अलिगड पोलिसांकडे धाव घेतली असली तरी, ही घटना बिहारमध्ये घडल्यामुळे अलिगड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले आहे. मात्र, अलिगडमध्ये ही घटना सध्या 'टॉक ऑफ द टाऊन' ठरली आहे.
लेकीचा संसार मोडणारी आई, सासूला घेऊन पळणारा जावई आणि आता त्याच सासूने जावयाला सोडून मेव्हण्यासोबत केलेला पोबारा... या घटनाक्रमामुळे नात्यांची किती मोठी घसरण होऊ शकते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे. या प्रकरणात पैशांचा मोह मोठा आहे की नात्यातील अनैतिकता, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/देश/
लेकीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळाली सासू, पण... आता कथेमध्ये आलाय असा ट्विस्ट की ऐकून पोलीसही चक्रावले
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement