काही लोकांना सतत डोकेदुखीचा त्रास असतो तर काही लोकांना कधीतरी याचा त्रास जाणवतो. मात्र तुम्हाला माहितीय का की, डोकेदुखी फक्त एक दोन प्रकारची नसते. डोकेदुखीचे सहा प्रकार आहेत. सगळ्या डोकेदुखी सारख्या नसल्यामुळे यावरचे उपचारही वेगवेगळे आहेत.
advertisement
तणाव - तणावामुळे अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे डोकं सतत जड वाटत राहतं. यामुळे मळमळ किंवा उलट्या होत नाहीत.
सायन - यामध्ये डोळे आणि कपाळाभोवती जड जाणवतं. डोके वाकवताना किंवा वळवताना वेदना वाढतात.
मायग्रेन - मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला हलके धडधडत वेदना सुरू होतात आणि त्या वाढत जातात. यात उलटी, मळमळ यांसारखी लक्षणेही दिसून येतात. प्रकाश पाहिल्यानंतर किंवा आवाज ऐकल्यानंतर ही वेदना आणखी वाढते. कोणत्याही शारीरिक हालचालींवर ही वेदना वाढते.
टीएमजे डिसॉर्डर - टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसऑर्डरमुळे डोक्यासह जबड्याभोवती तीव्र वेदना होतात. जबडा किंवा चेहऱ्यावर घट्टपणा येतो, जबडा आखडला जाणं ही देखील त्याची लक्षणे आहेत. दात घासताना, चघळताना, बोलताना किंवा जांभई घेताना वेदना होतात.
क्लस्टर हेड - ही वेदना क्लस्टर्समध्ये उद्भवतात. याचा अर्थ असा होतो की असह्य वेदना बहुतेक वेळा डोकेच्या एका बाजूला क्लस्टर जाणवतात. याच्या वेदना अचानकपणे होतात. डोक्याबरोबर डोळ्यांच्या आजूबाजूलाही वेदना होतात. धूम्रपान किंवा व्यायामामुळे ही वेदना वाढते.
एलर्जी डोकेदुखी - नाक, गालाची हाडे, कपाळ आणि कानांच्या वरच्या बाजूला हलके दुखणे ही ऍलर्जी डोकेदुखी असू शकते. हे परागकण ऍलर्जी किंवा धूळ ऍलर्जीमुळे असू शकते.
