आलू पोंगा बनवायचा म्हणजे आता यातील आलू म्हणजे बटाटा हा लागणार हे तुम्हाला माहिती झालं असेल. पण पोंगा म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. विदर्भातील लोकांना हा शब्द परिचित असेल. रेसिपी पाहता पाहता तुम्हालाही त्याची माहिती होईल.
advertisement
आलू पोंगा बनवण्यासाठी लागणारं बेसिक साहित्य : बटाटे, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, बॉबीज किंवा नळ्या हे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पदार्थ टाकू शकता जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीवर, जिरेपूड
आलू पोंगाची पहिली कृती
बटाटे उकडून घ्या. ते सोलून कुस्करून घ्या. त्यात आवडीनुसार मिरची पूड, गरम मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, थोडासा चाट मसाला टाकून नीट मिक्स करून घ्या.
नळ्या चांगल्या उन्हात वाळवून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात नळ्या तळून घ्या. वर तयार केलेल्या मिश्रणात नळ्या बुडवून तुम्ही टोमॅटो केचअपसोबत खाऊ शकता.
आलू पोंगाची दुसरी कृती
कुस्करलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला, सैंधव मीठ, हिरवी चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्या. हे सारण नळ्यांमध्ये भरा. नळ्याच्या दोन्ही बाजू बारीक शेवेत बुडवून चटणीसोबत खा.
आता एव्हान पोंगा म्हणजे काय तर नळ्या हे तुम्हाला आता समजलंच असेल. भूक लागली, काही झटपट बनवायचं असेल, मुलांच्या शाळेत कुकिंग कॉम्पिटेशनमध्ये नो कूक डिश असेल, तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. अगदी लहान मुलंही हा पदार्थ बनवू शकता.
Recipe Video : खरडन पिठलं कधी खाल्लंय का? पिठल्याचा वेगळाच प्रकार, भलतंच टेस्टी
तुम्ही हा आलू पोंगा बनवून पाहा आणि ती कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
