अँटी-इन्फ्लमेटरी डाएट म्हणजे काय ?
अँटी-इन्फ्लमेटरी या शब्दाचा अर्थ म्हणजे जळजळ विरहीत असा आहे. त्यामुळे अँटी-इन्फ्लमेटरी डाएट म्हणजे असं असं अन्न जे खाल्ल्याने आपल्या शरीराची जळजळ होणार नाही. मात्र रूतुजा दिवेकर यांनी या डाएटला विरोध दर्शवलाय. त्यांच्या मते जळजळ ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. मात्र जळजळीचं प्रमाण अधिक असेल तर ते वाईट आहे. त्यामुळे अँटी-इन्फ्लमेटरी डाएट करण्याऐवजी जंक फूड टाळून सकस, पोषक आहार किंबहुना घरी बनवलेलं अन्न खाणं केव्हाही फायद्याचं. त्यांनी इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडिओच शेअर करून प्रेक्षकांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. पाहुयात,
advertisement
घरी शिजवलेलं जेवण:
गॅसेस, अपचन, पित्ताचा त्रास टाळण्यासाठी अँटी-इन्फ्लमेटरी डाएट करण्यापेक्षा घरी तयार केलेले शिजवलेलं अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला रुजुता दिवेकरांनी दिलाय. याशिवाय अन्न खाताना, किंवा जेवताना टिव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर टाळण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. त्यांच्यामते जेव्हा आपण पूर्ण लक्ष केंद्रीत करून जेवतो तेव्हा अन्न लवकर पचतं. टिव्ही, मोबाईल बघत जेवणं हे आरोग्यासाठी घातक आहे.
दैनंदिन व्यायाम :
काहीही खाल्ल्यानंतर अन्न पूर्णपणे पचून, जळजळीचा त्रास होऊ नये यात व्यायामाची भूमिका मोठी आहे. मात्र व्यायाम योग्य प्रकारे आणि प्रमाणात करायला हवा. एकाच वेळी जास्त व्यायाम करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे सुरूवातीला वॉर्म अप सारखे व्यायाम प्रकार करून हळू हळू त्यांची तीव्रता वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
चांगली झोप:
पित्ताचा, जळजळीचा त्रास कमी करण्यासाठी चांगली झोप हा सुद्धा एक पर्याय असल्याचं दिवेकर सांगतात. त्यांनी चाळीशीत आलेल्या व्यक्तींना रात्री उशीरापर्यंत न जागण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्यामते आपलं शरीर जेव्हा तरूण असतं तेव्हा ते अनेक प्रकारचा ताण सहन करू शकतं. मात्र जसं तुम्ही चाळीशी पार करून पन्नाशी, साठीकडे झुकायला लागता तेव्हा तुमचं शरीर पूर्वीसारखा ताण सहन करू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला जळजळीचा त्रास होऊ शकतो.
ताण व्यवस्थापन:
मानसिक ताण तणाव हे अनेक आजारांचं मूळ हे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला फक्त जळजळच नाही तर अनेक त्रासांपासून आराम मिळतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी त्यांनी योगासनं करण्याचा सल्ला दिलाय.
व्हिडियोच्या शेवटी रूजुता दिवेकरांनी एक मोलाचा सल्ला दिलाय. तुमच्या आजुबाजूच्या व्यक्ती काय करतात, ते कोणतं डाएट करतात, याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही कोणत्या खोट्या, भूलथापा किंवा विचित्र डाएटपासून दूर राहू शकता ज्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत.