NiMe Diet for Weight Loss: वजन कमी करण्याचा जादुई मार्ग, आहारात करा ‘या’ डाएटचा समावेश, दुर्धर आजारही पळतील दूर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of NiMe Diet in Marathi: शास्त्रज्ञांनी आता वजन कमी करण्यासाठी NiMe डाएट तयार केलंय. त्यांचा दावा आहे की, या डाएटमुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. NiMe डाएट वजन कमी करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवण्यात मदत करतंय.
मुंबई : स्थूलपणा, ओबेसिटी किंवा वाढतं वजन ही संपूर्ण जगाची डोकेदुखी झालीये. स्थूलपणाचं प्रमाण असंच वाढत राहिलं आणि स्थूलपणाला वैश्विक महामारी म्हणून संबोधलं गेलं तर नवल नको वाटायला. जगातला असा एकही देश नसेल जिथे स्थूलपणाने शिरकाव केलेला नाही. बदलती जीवनशैली, सततचा ताणतणाव हे देखील स्थूलपणासाठी कारणीभूत ठरतात. वजन कमी करण्यासाठी वीगोभी नावाचे इंजेक्शन तयार केलं गेलंय. अमेरिका आणि युरोपमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर हे इंजेक्शन वापरण्यास सुरुवात केलीये. ज्यामुळे काही जणांमध्ये चांगले परिणामही दिसून आलेत. शास्त्रज्ञांनी आता वजन कमी करण्यासाठी NiMe डाएट तयार केलंय. त्यांचा दावा आहे की, या डाएटमुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. NiMe डाएट वजन कमी करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवण्यात मदत करतंय. त्यामुळे हे NiMe डाएटमुळे हृदयरोग आणि डायबिटीवरदेखील गुणकारी ठरताना दिसतंय.
जाणून घेऊयात हे NiMe डाएट नेमकं आहे तरी काय ?

advertisement
NiMe डाएट म्हणजे काय?
असं म्हटलं जातं जशजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसा अन्नाचा दर्जा हा खालावत गेला. अन्नावर विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्यामुळे त्यातली पोषकतत्वे नष्ट होऊ लागली. हाच धागा पकडून पूर्वीच्या काळी म्हणजेच जगात जोपर्यंत औद्योगिक क्रांती झाली नव्हती, त्या आधी लोकं ज्या पद्धतीचा आहार घेत होते तशाच प्रकारच्या आहारात थोडेफार बदल करून हा या निम डाएट तयार करण्यात आलाय. या नव्या डाएटमुळे फक्त वजनच कमी होत नाही तर आतड्यांना प्रचंड फायदा होतो. नव्या डाएटमुळे आतडे आतून तर स्वच्छ होतातच पण त्याचं आतलं आवरण किंवा अस्तरही मजबूत होतं. यामुळे जुन्या आणि दुर्धर आजारांचा धोकाही टाळता येतो. या नव्या डाएटमध्ये वनस्पती आधारित सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जसं की हिरव्या भाज्या, सर्व प्रकारच्या कडधान्यं, संपूर्ण धान्य आणि काही प्रमाणात प्राण्यांची प्रथिनं. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, मिठाई, मांस आणि गव्हापासून बनवलेल्या वस्तू या आहारातून वगळण्यात आल्या आहेत. या डाएटमध्ये फायबरचं प्रमाण 22 ग्रॅम प्रति 1000 कॅलरीज निश्चित करण्यात आलं आहे.
advertisement
पोटापासून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे निम डाएट

advertisement
आयर्लंड येथील प्रोफेसर पॉल रॉस सांगतात की, ‘अनेक आजारांची सुरूवात ही पोटातून होते. त्यामुळे पोटाला शांत केलं किंवा त्याला आराम दिला तर अनेक आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे आम्ही असं अन्न तयार केलंय ज्यामुळे पोटाला आराम मिळू शकेल. औद्योगिकीकरणामुळे आपल्या खाण्याच्या सवयींवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे आपल्या पोटातील मायक्रोबायोम् खराब झालेत. आपल्या पोटात चांगल्या गोष्टींचं वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आपण खाण्यापिण्याच्या जुन्या सवयी, पद्धतींकडे वळावं लागेल. हे संशोधन युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा यांसह अनेक विद्यापीठांतील संशोधकांनी केले असून त्याच्या मानवी चाचण्या करण्यात आल्या असून आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत. या डाएटमुळे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉल 17 टक्क्यांनी कमी झालं. याशिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण 6 टक्क्यांनी तर सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाण 14 टक्क्यांनी कमी झाले. हृदरोग आणि कर्करोगासाठी शरीरात सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचं जास्त प्रमाण हे कारणीभूत असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
NiMe Diet for Weight Loss: वजन कमी करण्याचा जादुई मार्ग, आहारात करा ‘या’ डाएटचा समावेश, दुर्धर आजारही पळतील दूर