High Protein Fruits: डोले शोले मसल्स बनवायचे आहेत ? मग विसरा प्रोटिन पावडर, खा ‘ही’ फळं, बनेल फिट आणि हेल्दी बॉडी

Last Updated:

Benefits of High Protein Fruits in Marathi: तुम्हालाही वजन कमी करायचं असेल किंवा मसल्स बनवायचे असतील तर तुम्ही प्रोटिन पावडर खाण्याऐवजी आम्ही सांगत असलेली फळं खा. जेणेकरून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स तर मिळतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

प्रतिकात्मक फोटो : डोले शोले मसल्स बनवायचे आहेत, मग विसरा प्रोटिन पावडर, खा ‘ही’ फळं, बनेल फिट आणि हेल्दी बॉडी
प्रतिकात्मक फोटो : डोले शोले मसल्स बनवायचे आहेत, मग विसरा प्रोटिन पावडर, खा ‘ही’ फळं, बनेल फिट आणि हेल्दी बॉडी
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जगात फिटनेस औषधापुरता उरलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जातात. जीम ट्रेनरच्या सल्ल्यानुसार ते डाएट सुरू करतात. ज्यांना लवकर वजन कमी करायचं आहे किंवा शरीरसौष्ठव स्पर्धेची तयारी करायची आहे, त्यांना जीम ट्रेनर प्रोटिन पावडर शेक पिण्याचा सल्ला देतात. यामुळे मसल्स बनतात खरे पण या प्रोटिन पावडरचे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल किंवा मसल्स बनवायचे असतील तर तुम्ही प्रोटिन पावडर ऐवजी आम्ही  सांगत असलेली फळं खा. जेणेकरून तुम्हाल भरपूर प्रमाणात प्रोटिन्स तर मिळतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, फळांना  सामान्यत: उच्च-प्रथिनंयुक्त अन्न म्हणजेच हाय प्रोटिन फूड म्हणून मानलं जात नाही. मात्र काही फळं अशी आहे ज्यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे स्नायूंना ताकद मिळून वजन कमी करायला मदत होते.

जाणून घेऊयात कोणत्या फळांमध्ये प्रोटिन्स जास्त असतात.

Benefits of High Protein Fruits in Marathi: डोले शोले मसल्स बनवायचे आहेत, मग विसरा प्रोटिन पावडर, खा ‘ही’ फळं, बनेल फिट आणि हेल्दी बॉडी
advertisement
अमेरिकेन कृषी विभागाच्या मते, ज्या फळांमध्ये 1 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनं असतात ती फळं वजन कमी करण्यासाठी फायद्याची ठरू शकतात. लिंबूवर्गीय फळं किंवा संत्र्यांमध्ये 1.2 ग्रॅम प्रथिनं असतात. याशिवाय ही फळं व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहायला मदत होते.
advertisement
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, फॅटी ॲसिडस् आणि अँटी-इंफ्लेमेटरी ॲसिड असतात, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते. याशिवाय रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यातही डाळिंब महत्त्वांची भूमिका बजावतं. साधारण कप डाळिंबाच्या दाण्यांमध्ये 2.9 ग्रॅम प्रथिनं असतात, जी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायद्याची ठरतात.
एका अहवालानुसार, फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर ब्लडप्रेशर आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा फणस फायद्याचं ठरू शकतं. फणसाला  प्रथिनांची खाण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. साधारणपणे फणसाच्या 3 ते 4 गऱ्यांमध्ये 2.6 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. याशिवाय फणसात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि काही जीवनसत्त्वं आढळून येतात.
advertisement

ब्लॅकबेरी :

1 कप कच्च्या ब्लॅकबेरीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन्स असतात. ब्लॅकबेरीज या अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होतं आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
advertisement
पेरूत असलेलं व्हिटॅमिन सी आणि फायबर्सचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. मात्र यासोबतच पेरूत मोठ्या प्रमाणात प्रथिनं म्हणजेच प्रोटिन्स आढळून येतात. साधारण एक कप आकाराच्या पेरूत 4.2 ग्रॅम प्रथिने आणि 9 ग्रॅम फायबर आढळून येतात.
advertisement
प्रोटिन्सच्या बाबतीत जर्दाळूला आश्चर्यकारक सुकामेवा म्हणता येईल. जेव्हा जर्दाळू हे कच्च किंवा फळाच्या रूपात असतं तेव्हा त्यात सुमारे 2.3 ग्रॅम प्रथिनं असतात. मात्र, जेव्हा जर्दाळू वाळवलं जाते तेव्हा प्रथिनाचं प्रमाण वाढून ते साधारण 4.4 ग्रॅम पर्यंत पोहचतं.
सुकामेव्याचा एक भाग असलेला मनुका हा द्राक्षांपासून बनतो हे आपण सगळेच जाणतो. साधारणपणे 100 ग्रॅम मनुक्यात 3.1 ग्रॅम प्रोटीन आढळून येतं. मनुक्यात असलेल्या  पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मनुके फायद्याचे ठरतात.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
High Protein Fruits: डोले शोले मसल्स बनवायचे आहेत ? मग विसरा प्रोटिन पावडर, खा ‘ही’ फळं, बनेल फिट आणि हेल्दी बॉडी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement