Orange Benefits in winter: हिवाळ्यात ‘या’ वेळी संत्री खाल्लीत तर होतील फायदे; वेळ चुकली तर पडाल आजारी

Last Updated:
Orange Health Benefits in winter: संत्र्यांत व्हिटॅमिन सी खूप जास्त असतं त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहायला मदत होते. मात्र तरीही अनेकादा संत्री खाल्ल्याने घसा खवखवण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घेऊया.
1/9
संत्र्याला हिवाळ्यातलं सुपरफूड मानलं गेलंय. संत्र्यांत व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.

advertisement
2/9
संत्र्यातल्या विविध पोषकतत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात थंडी आणि प्रदूषणामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाणं फायद्याचं ठरतं.

3/9
संत्र्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे हिवाळ्यात जिथे पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं अशा वेळी संत्री खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होते.

4/9
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ऐ आणि कॅरेटेनॉईड्स आढळून येतात. त्यामुळे संत्री ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची आहेत.

5/9
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होते याशिवाय फायबर्समुळे भूक कमी लागते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

6/9
संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्मुळे रक्तदाब नियंत्रीत राहून हृदयविकार आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळता येतो.

7/9
संत्र्यातल्या व्हिटॅमिन सी मुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार राहायला मदत होते. संत्र्यांच्या नियमित सेवनामुळे वयोमानाप्रमाणे येणाऱ्या सुरकुत्याचं प्रमाण कमी होतं.

8/9
संत्री ही चवीला गोड जरी असली तरीही ती खाल्ल्यानंतर रक्तात साखर ही हळूहळू सोडली जाते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी संत्री ही फायदेशीर आहेत. मात्र तरीही डायबिटीसच्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच संत्र्यांचं सेवन करावं.

9/9
हिवाळ्यात सकाळी किंवा रात्री वातावरण थंड असतं. अशावेळी संत्री खाल्ल्याने कफाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाण्याची योग्य वेळ ही दुपारची मानली जाते. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर संत्री खाल्लीत तर शरीराला अनेक फायदे होतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement