advertisement

तिसरी घंटा, पुन्हा एकदा! वीकेंडला थिएटरमध्ये नाहीये काही खास, या OTT वर बघा रंगभूमी गाजवलेली मराठी नाटकं

Last Updated:

एकाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल 75 मराठी नाटकं पाहायची संधी चालून आली आहे. थिएटरमध्ये न जाता घरबसल्या दर्जेदार मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.

News18
News18
या वीकेंडला थिएटरमध्ये काही नवीन सिनेमे नाहीत. काही खास आहे आणि पाहायला जावं असा हा वीकेंड नाही. धुरंदर 2 सुरू आहे पण अनेकांनी तो पाहिला असेल. मग आता वीकेंडला काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर मराठी नाटकं हा उत्तम पर्याय आहे. एकच वीकेंड आहे. घराबाहेर पडण्याचा कंटाळा आला असेल तर आहो घरबसल्या मराठी नाटकांचा आनंद घ्या. एकाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल 75 मराठी नाटकं पाहायची संधी चालून आली आहे. थिएटरमध्ये न जाता घरबसल्या दर्जेदार मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.
तिसरी घंटा, पुन्हा एकदा या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला नवं डिजिटल व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे नाटकप्रेमींसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांची पसंती OTT प्लॅटफॉर्मकडे वाढत चालली आहे. त्यामुळे रंगभूमीवरील गाजलेली नाटके घरबसल्या पाहण्याची ही उत्तम संधी आहे. थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहण्याचा अनुभव जरी वेगळा असला तरी या माध्यमातून जुन्या आणि नव्या पिढीला नाटकांचा वारसा अनुभवता येणार आहे.
advertisement
मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आता डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तिसरी घंटा, पुन्हा एकदा' या खास उपक्रमांतर्गत आता गाजलेली मराठी नाटके OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी मिळणार आहे. 27 मार्चपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर हा खास नाट्यसंग्रह उपलब्ध झाला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by TellyGappa (@tellygappa_official)



advertisement
मराठी नाटकांची परंपरा जपणारा हा उपक्रम प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. 'श्रीमंत दामोदर पंत' पासून 'यदा कदाचित' पर्यंत आणि 'जाऊ बाई जोरात' पासून 'धुमशान' पर्यंत विविध शैलीतील नाटके एका प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत. कॉमेडी, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यंग अशा विविध अंगांनी सजलेली ही नाटके प्रेक्षकांना पुन्हा एकदा रंगभूमीचा अनुभव देणार आहेत.
advertisement
या OTT प्लॅटफॉर्मवर तब्बल 75 हून अधिक मराठी नाटकांचा खजिना उपलब्ध आहे. यामध्ये 'बुवा तिथे बाया', 'गोपाळा रे गोपाळा', 'फादर माझा गॉडफादर' यांसारखी गाजलेली नाटके पाहायला मिळणार आहेत. तसेच 'नवरा म्हणू नये आपला', 'चोर चोर चाळीत चोर' आणि 'धुमशान' ही खिळवून ठेवणारी नाटकं देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तिसरी घंटा, पुन्हा एकदा! वीकेंडला थिएटरमध्ये नाहीये काही खास, या OTT वर बघा रंगभूमी गाजवलेली मराठी नाटकं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement