हा लठ्ठपणा नाही, गॅसेसमुळे वाढलंय पोट! आहारात या पदार्थांचा समावेश करा, आतड्याची सगळी घाण येईल बाहेर

Last Updated:

बद्धकोष्ठतेमुळे फुगलंय की, लठ्ठपणामुळे हे पटकन लक्षात येत नाही. मात्र बद्धकोष्ठतेमुळे फुगलेलं पोट तुम्ही सहज कमी करू शकता. भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

हा लठ्ठपणा नाही, गॅसेसमुळे वाढलंय पोट!
हा लठ्ठपणा नाही, गॅसेसमुळे वाढलंय पोट!
How to cure blotting जगातील बहुतांश लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट स्वच्छ होऊ शकत नाही. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेमुळे व्यक्तीचे पोट फुगलेले राहते. मात्र हे पोट बद्धकोष्ठतेमुळे फुगलंय की, लठ्ठपणामुळे हे पटकन लक्षात येत नाही. बद्धकोष्ठतेमुळे फुगलेलं पोट तुम्ही सहज कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतील. शुद्ध सात्विक आहारामुळे तुमचे आतडे निरोगी राहू शकतात. यामुळे पोट सहजपणे स्वच्छ होण्यास मदत होते.
कोरडं किंवा गाठयुक्त मल, आतड्यांच्या हालचालींदरम्यान वेदना, पोट पूर्णपणे साफ न होणे भूक न लागणे आणि ओटीपोटात सूज येणे ही बद्धकोष्ठतेची काही प्रमुख लक्षणं आहेत. यावर मात कशी करायची यासाठी काही सोप्या टिप्स इथे देत आहोत.
हिरव्या भाज्या
चांगल्या आहारासाठी करण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या. ज्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते अशा भाजांचा वापर वाढवा. तंतुमय पदार्थांमुळे पोट सहजपणे स्वच्छ होते. फायबरयुक्त भाज्यांमध्ये ब्रोकोली, गाजर, फुलकोबी, पालक, बीटरूट, बटाटे, गोड बटाटे, सोयाबीन, मटार, भोपळा आणि इतर भाज्यांचा समावेश होतो.
advertisement
कडधान्ये
राजमा, डाळी आणि अगदी मटार यासारख्या शेंगांसारख्या तंतुमय वनस्पती फायबरचे चांगले स्रोत आहेत. ज्यांचा समावेश तुमच्या आहारात केल्यामुळे तुमचं जेवण अधिक पौष्टिक होईल.
फळं
बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी करण्यासाठी फळे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. सफरचंद, नासपाती, द्राक्षे, ब्लॅकबेरी, रास्पबेरी आणि प्लम यासारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती फायबर्सनी समृद्ध असतात.
advertisement
याव्यतिरिक्त, आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. हे करण्यासाठी, आपण भरपूर पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी ताज्या फळांचा रस प्यायल्याने ही लक्षणे दूर होण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हा लठ्ठपणा नाही, गॅसेसमुळे वाढलंय पोट! आहारात या पदार्थांचा समावेश करा, आतड्याची सगळी घाण येईल बाहेर
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement