मोदक बनवताना टाळा या चुका..
- फक्त पाण्यामध्ये उकड काढू नका. फक्त दूध किंवा अर्धे दूध अर्धे पाणी वापरा. त्यामध्ये थोडं लोणीही घालावं.
- रेशनचे किंवा जुने तांदूळ वापरायचे नाही. यामुळे उकडीच्या मोदकाची पारी फाटते. सुवासिक आंबेमोहोर, इंद्रायणी हे तांदूळ वापरा.
- उकड थंड होऊ द्यायची नाही. ती गरम गरम असतानाच मळून घ्यायची. उकड छान मळून घेणे गरजेचे असते.
advertisement
- उकड मळण्यासाठी ती शक्यतो कोणत्याही धातूच्या भांड्यात घेऊ नये. धातूच्या भांड्यात गरम उकड टाकल्याने तिला काळपटपणा हे टाळण्यासाठी उकड काचेच्या भांड्यात घ्यावी.
- उकडीचे छान गोळे करून त्यावर ओले किंवा सुके कापड झाकन म्हणून ठेवावे.
- मोदकाच्या कळ्या बनवून त्या एकाच दिशेने ट्विस्ट करून मोदक बनवावा, यामुळे तो छान कळीदार तयार होतो.
- मोदक पत्रामध्ये ठेवताना ते खालच्या बाजून हलके पाण्यात बुडवून ठेवावे. जेणेकरून मोदक वाफवण्यासाठी याची मदत होते.
- पत्रामध्ये मोदक ठेवताना त्यामध्ये थोडं अंतर ठेवावं. यामुळे मोदक एकमेकांना चिकटणार नाही
- मोदकावर केशराची काडी ओली करून ठेवावी. यामुळे त्याचा छान रंग उतरतो.
- मोदक 8 मिनिटे वाफवून घ्यावे. त्यापेक्षा जास्त ते वाफवू नये. अन्यथा ते थंड झाल्यानंतर राबरासारखे लागतात.