आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, कळत नकळतपणे काही सवयींचा मेंदूच्या कार्यावर हळूहळू परिणाम होतो. या सवयी वेळीच रोखल्या नाहीत तर त्यामुळे ताण, चिंता आणि अल्झायमर यासारख्या अनेक प्रकारच्या मानसिक आजारांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
आपल्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संपूर्ण शरीराच्या कार्यांवरही मेंदू नियंत्रण ठेवतो. चांगले निर्णय घेण्यासाठी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्यासाठी निरोगी मन आवश्यक आहे.
advertisement
Work Place : 'सायलेंट को-वर्किंग स्पेसेस' म्हणजे काय ? अशा जागांचे नियम कोणते ?
कोणत्या सवयी मेंदूसाठी घातक आहेत समजून घेऊया.
अति ताण - सततच्या ताणामुळे मेंदूतील कॉर्टिसोल नावाचं संप्रेरक वाढतं, ज्यामुळे न्यूरॉन्सनचं नुकसान होतं आणि स्मरणशक्ती आणि शिकण्यावर परिणाम करतो.
शारीरिक हालचालींचा अभाव - दैनंदिन व्यायामाच्या अभावामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत. ज्यामुळे मेंदूचं कार्य हळूहळू कमी होतं.
झोपेचा अभाव - मेंदूच्या दुरुस्तीसाठी आणि स्मरणशक्तीसाठी दररोज सात-आठ तास गाढ झोप आवश्यक आहे. सतत झोपेचा अभाव असेल तर मेंदूच्या पेशींचं नुकसान होतं, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता बिघडते.
अयोग्य आहार - जास्त प्रमाणात जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न किंवा साखर खाल्ल्यानं मेंदूची रचना आणि संवाद कौशल्यं बिघडू शकतात. ओमेगा-3 फॅटी ॲसिड, बी जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरता यामुळे मेंदूच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
जास्त पाणी पिणं - खूप कमी पाणी प्यायल्यानं मेंदूचा थकवा, एकाग्रता कमी होणं आणि चिडचिड होऊ शकते. मेंदूच्या योग्य कार्यासाठी हायड्रेटेड राहणं आवश्यक आहे.
खूप जास्त आवाजात संगीत ऐकणं - हेडफोन्समधून सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याच्या सवयीमुळे ऐकण्याच्या क्षमतेवर आणि पर्यायानं मेंदूच्या श्रवण प्रक्रियेवर परिणाम करते.
मल्टीटास्किंग - मल्टीटास्किंगच्या सवयीमुळे मेंदूवर ताण वाढतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणं आणि कार्यक्षमता प्रभावित होते.
Thyroid : थायरॉईडमुळे वजन वाढतं पण का वाढतं ? जाणून घ्या शास्त्रीय कारण
सोशल नेटवर्किंगचा अभाव - जास्त वेळ एकटं राहिल्यानं किंवा इतरांशी संवाद न साधल्यानं मेंदू मंदावतो, ज्यामुळे नैराश्य आणि स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवतात.
नाश्ता वगळणं - नाश्ता केल्यानं मेंदूला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. नाश्ता न केल्यानं लक्ष केंद्रित करणं आणि विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
धूम्रपान आणि मद्यपान - अमली पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या नसांना हळूहळू नुकसान होतं, ज्यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. या सवयी टाळा, मेंदूची काळजी घ्या.
