TRENDING:

लग्नासाठी खरेदी करा सुंदर दागिने, किंमत 400 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला असल्यामुळे प्रत्येक नवरी आपल्या लग्नात पण लूक सुंदर कसा होईल याकडे विशेष लक्ष पुरवत आहे. नवरीच्या वेशभूषेला खऱ्या अर्थाने सुंदर दागिने बनवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला असल्यामुळे प्रत्येक नवरी आपल्या लग्नात पण लूक सुंदर कसा होईल याकडे विशेष लक्ष पुरवत आहे. नवरीच्या वेशभूषेला खऱ्या अर्थाने सुंदर दागिने बनवतात. त्यामुळे हे दागिने कुठे मिळतील याच्या शोधात सध्या सगळे जण आहेत. डोंबिवलीतील राधा कलेक्शनमध्ये नवरीसाठी लागणारे सगळे दागिने उपलब्ध आहेत. यांची किंमत सुद्धा अगदी कमी आहे.

advertisement

फक्त नवरीसाठीच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या सणसमारंभासाठी दागिने शोधायचे असतील तर हे बेस्ट ऑप्शन आहे. पारंपारिक दागिन्यांसाठी राधा कलेक्शन खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला साऊथ इंडियन दागिन्यांपासून ते कोल्हापुरी साज इथपर्यंत सगळं मिळेल. या राधा कलेक्शनमध्ये तुम्हाला ब्रायडल ॲक्सेसरीजमध्ये नथींचे अनेक प्रकार उपलब्ध आहे.

डिझाईनचे प्रिंटेड टी-शर्ट करा डोंबिवलीत खरेदी, गिफ्ट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन, किंमत फक्त 400 रुपये

advertisement

पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध प्रकार मिळतील. कोल्हापुरी साजमध्ये सुद्धा तुम्हाला पारंपारिक कोल्हापुरी दागिन्यांसोबत संपूर्ण सेट मिळेल. साउथ इंडियन लुकसाठी लागणारे मोत्यांचे दागिने इथे मिळतील. या सेटची किंमत हजार ते दोन हजारांपासून सुरू होते. तुम्हाला इथे सिम्पल लुकसाठी लागणारे कंठी हार फक्त 400 पासून मिळतील.

advertisement

'मी गेले काही वर्ष हा व्यवसाय ऑनलाइन केला. त्यानंतर आता मी काहीच महिन्यांपूर्वी इथे हा राधा कलेक्शनचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय सुरू करण्यामागे प्रमुख उद्देश आहे की स्वस्त दरात सुंदर दागिने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत,' असे व्यावसायिका दर्शना यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

मग मंडळी वाट कसली पाहताय तुम्हालाही सुंदर सुंदर व्हरायटीमधले दागिने आणि स्वस्तातील नवरीचे दागिने, साउथ इंडियन लूक वर लागणारे दागिने खरेदी करायचे असतील तर नक्की डोंबिवलीतील रामनगर येथे असणाऱ्या राधा कलेक्शनला भेट द्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नासाठी खरेदी करा सुंदर दागिने, किंमत 400 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल