जाणून घेऊयात बीट खाण्याच्या फायद्यांविषयी
बीटमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे बीट त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. बीट खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बीट हा एक उत्तम पर्याय आहे. बीटरूटचं सेवन आणि त्वचेला बीटरूटचा ज्यूस लावल्याने त्वचा उजळून निघते. बीट हा ॲक्टिव बॉडी क्लिनझर म्हणून काम करतो. मुरुम, मुरुमांचे डाग काढून टाकण्यात बीट महत्त्वाची भूमिका बजावतं.
advertisement
जाणून घेऊयात अन्य पदार्थासोबत बीटरूटचा वापर केल्यास त्याचे फायदे कसे वाढतात ते
बीटरूट आणि चंदन पावडर
त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तुम्ही बीटरूटची जाड पेस्ट बनवून घ्या. त्यात एक चमचा चंदन पावडर घाला. ही पेस्ट दररोज 15 मिनिटे लावा. तुम्हाला दोन आठवड्यांत हळूहळू परिणाम दिसू लागतील.
बीट आणि कोरफड
ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी बीट आणि कोरफडीचं जेल खूपच फायदेशीर आहे. बीटरूट किसून घ्या किंवा त्याची जाड पेस्ट बनवा. त्यात थोडं कोरफडीचं जेल किंवा तुमच्या घरात कोरफड असेल तर ती कोरफड कापून त्याच्या आतला गर पेस्टमध्ये टाका. व्यवस्थित मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा अंगावर 20 मिनिटं लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. तुमची त्वचा कोमल झाल्याचं तुम्हाला जाणवेल.
हे सुद्धा वाचा : बीट खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील; मेंदूही असा वेगात करेल काम
बीट, गुलाबपाणी, बेकींग सोडा आणि कडूनिंबाची पावडर
तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तर बीट, गुलाबपाणी, बेकींग सोडा आणि कडूनिंबाची पावडर एकत्र करून ती पेस्ट तुमच्या पिंपल्सवर आणि चेहऱ्यावर पडलेल्या मुरूमांच्या डागांवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर ती थंड पाण्याने धुवून घ्या. तुमच्या पिंपल्सच्या समस्या आणि मुरूमांचे डाग हळूहळू कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल.