अक्रोडं भिजवणं का महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊया. बऱ्याचदा लोक बदाम, बेदाणे, खजूर आणि इतर अनेक ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर खातात. पण, बरेच लोक अक्रोड न भिजवता थेट खातात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे बदामासह इतर सुका मेवा भिजवून ठेवणे फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
Nipah Virus : पुन्हा 'लॉकडाऊन'! कोरोनानंतर निपाहचा हाहाकार, दुकानं बंद, लग्नातही निर्बंध
advertisement
निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने भिजवलेले अक्रोड खावे. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने ते सहज पचतात, आणि त्यातील पोषक तत्वे शोषली जातात असे नोएडाच्या 'डाइट मंत्रा क्लिनिक'च्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी सांगितले. कच्चे अक्रोड खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, कारण अक्रोडात फायटिक अॅसिडसह अनेक घटक असतात, जे सहज पचत नाहीत. अक्रोड भिजवून ठेवल्यास या घटकांचा प्रभाव कमी होतो आणि ते सहज पचतात. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
झोपताना लहान बाळांच्या डोक्याखाली उशी ठेवणे कितपत योग्य? तज्ज्ञांनी सांगितले गंभीर तोटे
अक्रोड भिजवल्यानं त्यावरील बुरशी, बॅक्टेरिया आणि इतर दूषित घटक दूर होतात. यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्येचा धोका दूर होऊ शकतो. ज्याप्रमाणे लोक बदाम आणि इतर ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी खातात, त्याचप्रमाणे अक्रोड भिजवून खाणं अधिक फायदेशीर असल्याचं कामिनी सांगतात.
दररोज 4-5 अक्रोड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, कारण अक्रोडात पोषक तत्वांचा मोठा साठा असतो. अक्रोडाचे अनेक प्रकार आहेत आणि सर्व प्रकारचे अक्रोड शरीरासाठी पोषक आहेत.
- भिजवलेले अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. ही पोषक तत्वं हृदयाच्या धमन्या स्वच्छ करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- पचनक्रिया मजबूत होण्यासाठी भिजवलेले अक्रोड खावेत. अक्रोडमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतं. फायबरमुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीदेखील अक्रोड फायदेशीर आहे.
- मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडाचं सेवन करावं. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतात. हे पोषक घटक मेंदूच्या पेशी निरोगी ठेवतात आणि स्मरणशक्ती सुधारू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज अक्रोड खा.
- भिजवलेले अक्रोड त्वचेला तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. अक्रोडात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला पोषण देतात. हे घटक त्वचेची जळजळ कमी करतात, ज्यामुळे त्वचेमध्ये चमक आणि कोमलता टिकून राहते.
- वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी भिजवलेले अक्रोड खाणं फायदेशीर ठरू शकतं. अक्रोडात प्रथिनं आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रित राहते.