Nipah Virus : पुन्हा 'लॉकडाऊन'! कोरोनानंतर निपाहचा हाहाकार, दुकानं बंद, लग्नातही निर्बंध
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
Nipah virus : निपाह व्हायरस कोरोनासारखा घातक ठरू शकतो. त्यामुळे केरळ सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंटेनमेंट झोन तयार केले आहेत आणि काही निर्बंधही लादले आहेत.
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मलप्पुरममध्ये निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे 24 वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केरळ सरकारने मलप्पुरममध्ये अनेक कंटेनमेंट झोन तयार केले आहेत आणि काही निर्बंधही लादले आहेत. मलप्पुरम जिल्ह्यातल्या दोन पंचायतींमधील पाच वॉर्ड कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
निपाह हा एक झूनॉटिक व्हायरस आहे. म्हणजेच अगोदर त्याचा संसर्ग प्राण्यांमध्ये होतो आणि नंतर त्याची माणसाला लागण होते. टेरोपोडिडे फॅमिलीतली फ्रूट बॅट्स (वटवाघळे) निपाह व्हायरचे नैसर्गिक होस्ट असतात. माणसामध्ये गंभीर श्वसन संसर्ग आणि एन्सेफेलायटिस किंवा मेंदूज्वरासाठी हा व्हायरस कारणीभूत ठरतो. हा व्हायरस कोरोनासारखा घातक ठरू शकतो. त्यामुळे केरळ सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
आरोग्यमंत्री म्हणाले...
केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी सांगितलं, की 9 सप्टेंबर रोजी मृत्यू झालेल्या 24 वर्षांच्या तरुणाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. मृताच्या संपर्कात आलेल्या 175 जणांची यादी तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये 74 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांना आयसोलेशनमध्ये (विलगीकरणात) ठेवण्यात आलं आहे.
advertisement
निपाहला रोखण्यासाठी निर्बंध
निपाहचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोनमधली दुकानं संध्याकाळी सात वाजल्यानंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कंटेनमेंट झोनमधले सिनेमा हॉल, शाळा, कॉलेज, मदरसे, अंगणवाड्या आणि ट्युशन सेंटर्स बंद ठेवण्यात आली आहेत. मलप्पुरम जिल्ह्यात अंशत: निर्बंध लादण्यात आले आहेत. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लग्न, अंत्यसंस्कार आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मृताच्या घरापासून तीन किलोमीटरच्या परिसरात तापाचं सर्वेक्षण सुरू झालं आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने 66 पथकं तयार केली आहेत.
advertisement
यापूर्वी, 21 जुलै रोजी निपाह संसर्गावर उपचार सुरू असताना एका मुलाचा मृत्यू झाला होता. या वर्षातला राज्यातला निपाह संसर्गामुळे झालेला तो पहिला मृत्यू होता. कोळिकोड जिल्ह्यात 2018, 2021 आणि 2023मध्ये व एर्नाकुलम जिल्ह्यात 2019 मध्ये निपाहचा उद्रेक झाला होता. कोळिकोड, वायनाड, इडुक्की, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमधल्या वटवाघळांमध्ये निपाह व्हायरसच्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
Location :
Kerala
First Published :
September 17, 2024 10:29 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nipah Virus : पुन्हा 'लॉकडाऊन'! कोरोनानंतर निपाहचा हाहाकार, दुकानं बंद, लग्नातही निर्बंध