TRENDING:

Health Risk Of The Day : क्रिस्पी ब्रेड, चपाती, रोटी आवडते; मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण! खाण्याआधी एक्सपर्ट काय सांगतात पाहा

Last Updated:

Chapati Cause Cancer : चपाती भारतीय आहारातील एक पदार्थ. आपण दररोज खातो. अशी ही चपाती यामुळे कॅन्सरचा धोका आहे, असं सांगितलं तर... साहजिकच धक्का बसेल. याबाबत एक्सपर्ट काय सांगतात पाहुयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चपाती भारतीय आहारातील एक पदार्थ. आपण दररोज चपाती खातो. कित्येकांचा सकाळचा नाश्ताच चहा-चपाती, भाजी-चपाती आहे. शाळा असो, कॉलेज असो वा ऑफिस, दुपारच्या जेवणासाठीही आपण डब्यात चपाती नेतो. अशी ही चपाती यामुळे कॅन्सरचा धोका आहे, असं सांगितलं तर... साहजिकच धक्का बसेल. याबाबत एक्सपर्ट काय सांगतात पाहुयात.
News18
News18
advertisement

चपाती बनवण्याच्या पद्धतीवर एक संशोधन करण्यात आलं. यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. चपाती चुकीच्या पद्धतीनं बनवल्यास कॅन्सर अर्थात कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असं या संशोधनात दिसून आलं आहे.

Health Risk Of The Day : चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने काय होतं?

प्रत्येक घरामध्ये चपाती बनवण्याच्या पद्धतीत थोडा फरक आहे. काही लोक तव्यावर थोडी चपाती भाजतात त्यानंतर चिमट्याच्या मदतीने गॅसवर राहिलेली चपाती भाजतात. मात्र काही लोक केवळ तव्यावरच चपाती पूर्णपणे भाजून घेतात. या दोन्ही प्रकारे चपाती भाजल्यास तिच्या चवीत फरक पडतो असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे.

advertisement

चपाती आणि कॅन्सरबाबत संशोधन

न्युट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही उच्च तापमानावर चपाती बनवली तर त्यात कार्सिनोजेनिक घटक तयार होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो, तर सामान्य लोकांना श्वसन विकार होण्याचा धोका वाढतो.

एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, कुकटॉप आणि एलपीजी गॅसमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साईड सारखे अनेक धोकादायक वायू उत्सर्जित होतात.

advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने हे वायू आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. यामुळे श्वसन विकार, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकार होतात. यामुळे माणसाचा जीवही जाऊ शकतो.

Health Risk Of The Day : सलाड बिलकुल खाऊ नका, तज्ज्ञांनी का दिला असा सल्ला? सांगितला धोका

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्यामते, “गॅसवर चपाती करताना त्यातून एक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. तसेच थेट गॅसच्या ज्वाळांवर चपाती भाजल्यास त्यात कार्सिनोजेन्स तयार होतात. हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात” या संशोधनातून निष्पन्न झालेले निष्कर्ष खरे आहेत, हे ठोसपणे सांगता येत नाही. पण संशोधनातील बाबी माणसांमध्ये चिंता निर्माण करणाऱ्या आहेत, हे नक्की.

advertisement

तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात?

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत सांगितलं की, करपलेला ब्रेड, तंदुरी रोटी ही तुम्हाला क्रिस्पी लागू शकते पण यामुळे कॅन्सर होऊ शकतो. करपलेली क्रिस्पी रोटी कॅन्सरची सुरुवात असू शकते. जेव्हा तुम्ही कोणत्याही पदार्थांना जास्त कुक करता विशेषतः बटाटा, ब्रेड, चपाती, तेव्हा त्यातून एक केमिकल रिलीज होतं, त्याचं नाव आहे एक्रिलामाइड , असा घटक तुमचे डीएनए डॅमेज करू शकतं आणि इथूनच कॅन्सरची सुरुवात होऊ शकते. म्हणून ब्रेड गोल्डन ब्राऊन राहू द्या. ब्रेड काळा झाला की त्यावरील काळं काढून टाकलं म्हणजे धोका टळता तर तसं नाही. आयुष्य गोल्डन ब्राऊन राहू द्या, काळं करू नका.

advertisement

Health Risk Of The Day : तांब्याच्या बाटलीतील पाणी धोकादायक, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

तसंच कॅन्सर सर्जन डॉ. जयेश शर्मा म्हणाले, ब्रेडमुळे कॅन्सर होण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यात एक्रिलामाइड बनतं. हा घटक जास्त प्रमाणात प्राण्यांना दिल्याने कॅन्सर झाल्याचं दिसून आलं आहे. पण माणसात कॅन्सर होण्याचे अद्याप पुरावे नाहीत. तरी हे टाळणंच आपल्यासाठी चांगलं आहे. दुसरं म्हणजे शर्करा वाढते, मैद्याच्या कोणतेही पदार्थ विशेषत: बेक केलेल्या पदार्थामुळे शुगर वाढते. यामुळे लठ्ठपणा, इन्फ्लेमेशन वाढते. पण नियंत्रित प्रमाणात ब्रेड खाल्ला तर धोका नाही. मल्टीग्रेन ब्रेड खा. व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेडही चांगला नाही. व्हाइट ब्रेड कलर करून ब्राऊन ब्रेडच्या नावाने विकला जातो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

सगळ्यात जास्त भीती आहे ती चपातीची. चपाती गॅसवर शेकल्याने गॅसमधील केमिकल चपातीला लागतं आणि त्यामुळे कॅन्सर होतो, असं सांगितलं जातं. तसं नाही. पण जर चपातीवर काळे डाग आले तर या काळ्या भागात एक्रिलामाइड असतं. ज्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे चपाती गॅसवर शेकवायची तर हळू शेकवा, घाईत नाही. त्यावर काळे डाग पडू देऊ नका. मग चपातीमुळे कॅन्सर वगैरे काही होणार नाही, असं डॉ. शर्मा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : क्रिस्पी ब्रेड, चपाती, रोटी आवडते; मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण! खाण्याआधी एक्सपर्ट काय सांगतात पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल