हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात.यामुळे रक्तदाब नियंत्रित होऊन हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो.
हाडं होतात मजबूत
ब्रोकोलीमध्ये असलेले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के हाडे मजबूत करतात. त्यामुळे संधीवात, गुडगेदुखी ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.
'‘ही’ चटणी दूर करेल अनेक आजार; ‘अशी’ बनवा आरोग्यदायी हिरवी चटणी'
advertisement
त्वचा होते चमकदार
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून हातापायांना भेगा पडण्याचं प्रमाण वाढतं. अशावेळी ब्रोकोलीत असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि ती तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
प्रतिकारशक्ती वाढते
हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका अनेकदा वाढतो. ब्रोकोलीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
'Oral hygiene खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण, योग्यवेळी बदला टूथब्रश'
वजन कमी करण्यास उपयुक्त
ब्रोकोलीत फायबर्स हे जास्त असतात. ज्यामुळे पचन सुधारून भूक कमी लागते.याशिवाय ब्रोकोलीमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
तुम्ही ब्रोकोलीची भाजी, स्मूदी, सलाड किंवा सूपा अशा विविध पद्धतीने आहारात समावेश करू शकता.