‘ही’ चटणी दूर करेल अनेक आजार; ‘अशी’ बनवा आरोग्यदायी हिरवी चटणी

Last Updated:

Green chutney for Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैली बदल केले पाहिजे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते. एक हिरवी चटणी तुमचा युरिक ॲसिडचा त्रास दूर करू शकते.

प्रतिकात्मक फोटो : हिरवी चटणी ठेवेल अनेक आजारांना दूर
प्रतिकात्मक फोटो : हिरवी चटणी ठेवेल अनेक आजारांना दूर
मुंबई: जंकफूड किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे युरिक ॲसिडचा त्रास सुरू होतो. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, टाचदुखी आणि आरोग्यासंबंधित अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. युरिक ॲसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो. घाण किंवा टाकाऊ पदार्थ किडनी फिल्टर करून शरीराबाहेर टाकते. पण जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे, सूज येणे, चालताना पाय दुखणे असे त्रास सुरू होतात.अशावेळी युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैली बदल केले पाहिजे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते.
आहारतज्ज्ञांच्या मते रोजच्या हिरव्या चटणीचा वापर आहारात केल्यामुळे शरीरातून युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, आले, लिंबांचा वापर केला जाऊ शकतो. लिंबातलं व्हिटॅमिन सी, आलं आणि पुदिन्यातले अँटिऑक्सिडंट्स शरीरातले विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकायला मदत करतात. हिरव्या चटणीमुळे लघवीचे होण्याचं प्रमाण वाढून  लघवीद्वारे यूरिक ऍसिड काढून टाकण्यास मदत होते. यामुळे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर पडतीलच मात्र त्याचबरोबर किडनीचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल.
advertisement
लसूण आणि आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे यूरिक ऍसिडमुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. या चटणीमध्ये वापरण्यात आलेले मसाले पचनक्रिया मजबूत करतात आणि यामुळे पोटही साफ होते. त्यामुळे या चटणीचा वापर आहारात करणे गरजेचे आहे.
advertisement
या व्यतिरिक्त तुम्ही आल्याचा चहा आणि काकडी पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर पिऊ शकता ज्यामुळे युरिक ॲसिडचा त्रास कमी व्हायला मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
‘ही’ चटणी दूर करेल अनेक आजार; ‘अशी’ बनवा आरोग्यदायी हिरवी चटणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement