TRENDING:

गाजर की मुळा? हिवाळ्यात कोणती भाजी शरीरासाठी सर्वाधिक गुणकारी? वाचा एका क्लिकवर

Last Updated:

हिवाळा सुरु झाल्यावर आपल्या थाळीमध्ये काही हंगामी भाज्यांचा आपोआप समावेश होतो. हिवाळ्यात मुळा आणि गाजर या दोन्हीही भाज्या शरीरासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे थोडसं जाणून घेणं गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: हिवाळा सुरु झाल्यावर आपल्या थाळीमध्ये काही हंगामी भाज्यांचा आपोआप समावेश होतो. त्यामध्ये सर्वात पौष्टिक आणि उपयुक्त म्हणजे गाजर आणि मुळा. त्वचा, पचन, रोगप्रतिकार शक्ती या सगळ्यांचं आरोग्य टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं काम या दोन साध्या भाज्या हिवाळ्यात करतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुळा अनेक लोक अजिबात खात नाहीत. काहींना त्याचा वास, तर काहींना पचनाचा त्रास म्हणून ते मुळापासून दूर राहतात. पण हिवाळ्यात मुळा आणि गाजर या दोन्हीही भाज्या शरीरासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे थोडसं जाणून घेणं गरजेचं आहे.
advertisement

‎गाजरातील बीटा कॅरोटिन शरीराला व्हिटॅमिन A देतं आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, त्वचेला चमक आणि रोगप्रतिकार शक्ती टिकून राहते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, चेहरा निस्तेज दिसतो. अशा वेळी गाजरामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात. त्याचबरोबर फायबरमुळे पचन सुधरतं आणि शरीर हलकं वाटतं. ‎मुळ्यामध्ये व्हिटॅमिन C आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते. लिव्हर आणि किडनीच्या कार्यावर मुळा विशेष उपयुक्त ठरतो. पोट साफ ठेवणं, ॲसिडिटी कमी करणं, सर्दी-खोकल्याशी लढणं, हे सर्व मुळा नैसर्गिकरित्या काम करतो. काहींना मुळा खाल्ल्यावर पोट फुगल्यासारखं वाटतं, पण दिवसा, थोडं मीठ- लिंबूसोबत खाल्ल्यास तो सहज पचतो.

advertisement

‎गाजराचा समावेश अतिशय सोपा आहे. दररोजच्या कोशिंबिरीत गाजराची भर घालू शकता. सकाळी गाजराचा ज्यूस, दुपारी गाजर कच्चं चावून खाणं किंवा संध्याकाळी हलकं सूप, हे पर्याय उत्तम आहेत. गाजराचा हलवा हा तर हिवाळ्यातील आवडता गोड पदार्थ आहे. त्यातही साखर कमी ठेवून खाल्ल्यास पौष्टिक आणि पचायला हलका असतो. तसेच दाळ- खिचडीत, पराठ्यात किंवा उपम्यात किसलेलं गाजर टाकलं तरी चव वाढते आणि पौष्टिकता दुप्पट होते. ‎मुळ्याचा आहारात समावेश थोडा विचार करून करावा. कच्चा मुळा मीठ, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर घालून कोशिंबीर म्हणून खाल्ल्यास अतिशय फायदेशीर ठरतो. मुळ्याचा पराठा, सांभार, थालीपीठ किंवा सूप हे पर्यायही छान हलके आणि स्वादिष्ट असतात.

advertisement

मुळा रात्री न खाता दिवसा खाल्ल्यास पचन चांगलं राहतं. मुलांना गाजर खूप सोपं आहे, कारण त्याची गोड चव त्यांना आवडते. त्यांच्या डब्यात गाजराचे स्टिक्स देऊ शकता किंवा त्यावर थोडं चीज, बटर किंवा पीनट बटर लावून स्नॅक बनवू शकता. उपमा, पोहे, पराठे, पिठलं-भाकरी, यात किसलेलं गाजर सहज मिसळता येतं. मुलांना दिसतही नाही आणि खायला छान लागते. ‎मुळ्याबाबत थोडी क्रिएटिव्हिटी गरजेची आहे. मुळ्याचे पराठे, ढोकळा, थालीपीठ किंवा मुळ्याचे कटलेट्स हे पर्याय मुलांना आवडतात. मुळ्याची चव लपवण्यासाठी त्यात बटाटा, बेसन किंवा थोडासा गाजरही मिसळू शकता. सूप तयार करताना मुळा, गाजर आणि टोमॅटो एकत्र उकळून ब्लेंड केल्यास त्याची चव खूप माइल्ड होते, आणि मुलं ते सहज पितात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

हिवाळ्यातील या दोन भाज्या गाजर आणि मुळा शरीराला उब देतात, त्वचा सुधारतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचनक्रिया निरोगी ठेवतात. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आहारातही गाजर आणि मुळ्याचा नियमित समावेश करायला विसरू नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गाजर की मुळा? हिवाळ्यात कोणती भाजी शरीरासाठी सर्वाधिक गुणकारी? वाचा एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल