पचन सुधारतं (Carrom seeds helps to boost metabolism and Digestion)
ओवा पचनात महत्त्वाची भूमिका बजावतो म्हणूनच जेवणानंतर अनेकदा बडीशोप बरोबर ओवाही खाल्ला जातो. ओव्याचे दाणे दिसायला जरी बारीक असले तरीही ते विविध पोषक तत्त्वांनी परीपूर्ण असतात. ओवा खाल्ल्याने ॲसिडिटी, अपचन आणि गॅसेस सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओव्यात असलेले सक्रिय एंझाइम्स पचन प्रक्रियेला चालना देतात आणि गॅस्ट्रिक रसाचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे जेवण पचायला मदत होते. ज्यांना अपचानाचा त्रास आहे, त्यांना जेवल्यानंतर ओवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
श्वसनविकार (Benefits of Carrom seeds in viral dieses)
ओवा हे सर्दी आणि खोकल्यावर प्रभावी औषध मानलं जातं. ओव्यामुळे श्वसनमार्गातले अडथळे दूर व्हायला मदत होते.लहान मुलं जर आजारी पडली तर त्यांना तव्यावर ओवा भाजून, तो रूमालात बांधून नाकाजवळ धरला तर सर्दी,खोकल्याचा त्रास लवकर दूर होतो.
advertisement त्वचेसाठीही ओवा फायद्याचा (Benefits of Carrom seeds for skin)
त्वचेसाठीही ओवा फायद्याचा (Benefits of Carrom seeds for skin)
ओव्यातमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. सूर्याच्या किरणांमुळे होणारे नुकसान तसेच सुरकुत्या, बारीक रेषा, डाग, काळी वर्तुळे दूर करण्यात ओवा प्रभावी आहे. हे मुरुम आणि मुरुमांचे डागही ओव्यामुळे कमी होतात. ओव्याच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.
संसर्गाशी लढण्यास मदत
ओव्यामध्ये अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिफंगल गुणधर्म आहेत जे एखाद्या दुखापतीनंतर संसर्ग रोखण्यात मदत करतात.
ओव्याचे गुणधर्म आणि फायदे पाहिल्यानंतर जाणून घेऊयात ओव्याचं सेवन कशा आणि किती प्रकारे करता येईल.
ओव्याचा चहा
रोज सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा प्यायची सवय आहे. मात्र दुधसारखेच्या चहाने काहींना ॲसिडिटीचा त्रास होतो. तर डायबिटीस असणाऱ्यांना चहा पिता येत नाही. अशा वेळी ओव्याचा चहा तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकेल. हा चहा करण्यासाठी एक चमचा ओव्याचे दाणे आणि एका चमचा मध पाण्यात टाकून ते उकळून घ्या. जर तुम्हा ओवा थेट खायला आवडत नसेल तर तयार झालेला चहा गाळून घ्या. ओव्याच्या या चहामुळे मेटाबॉलीझम सुधारेल.
हे सुद्धा वाचा :Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे
ओवा आणि लिंबाचा रस
ओव्याचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कोमट पाण्यात भिजलेला ओवा टाकून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी प्या. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकायला मदत होईल.
ओव्याचं पाणी
जर तुम्हाला ओव्याचा चहा करायला किंवा त्यात लिंबू पिळून घ्यायला वेळ नसेल तर एक चमचा ओव्याचे दाणे एका कप पाण्यात उकळून घ्या. हे गरम पाणी तुम्ही सकाळी सकाळी उपाशी पोटी प्यायलात तर तुमचे गॅसेसचे प्रॉब्लेम दूर होऊन पचन सुधारेल .