Uric Acid Problem in winter : हिवाळ्यात युरिक ॲसिडमुळे दुखतात सांधे? मग खा ही फळं, युरिक ॲसिडचा त्रास होईल कमी

Last Updated:

Best fruits for uric acid: युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर फळं कोणती आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषकतत्त्वेही मिळतील आणि औषधांच्या साईडइफेक्टचा त्रासही होणार नाही.

Best fruits for uric acid: युरिक ॲसिडच्या त्रासावर वरदान आहेत ‘ही’ फळं
Best fruits for uric acid: युरिक ॲसिडच्या त्रासावर वरदान आहेत ‘ही’ फळं
मुंबई : सध्या अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. सांधेदुखीमागे महत्त्वाचं कारण आहे ते युरिक ॲसिड. बदलत्या जीवनशैलीमुळे युरिक ॲसिडचा त्रास तरूणांपासून वृद्धांना होऊ लागलाय. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. सांधेदुखीवर विविध पेनकिलर्स वापरले जातात. मात्र हवा तसा परीणाम दिसून येत नाही. कधी कधी औषधांचे साईड इफेक्ट्स आणि त्यातून होणारे त्रास  हे वेगळेच. आज आम्ही तुम्हाला सांगाणार आहोत युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर फळं कोणती आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषकतत्त्वेही मिळतील आणि औषधांच्या साईडइफेक्टचा त्रासही होणार नाही.

युरिक ॲसिडचा त्रास कमी खावीत ही फायदेशीर फळं (Best Food For Uric Acid problem)

केळी (Banana)

आपल्या सगळ्यांना बारा महिने सहज उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळी. युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यात केळी महत्त्वाची भूमिका बजवतात. केळ्यांमध्ये प्युरिन कमी असते, ज्यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात राहतं आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

संत्री (Oranges)

advertisement
हिवाळ्यात उपलब्ध होणारं सगळ्यांच्या आवडीचं आबंटगोड फळ म्हणजे संत्री. संत्र्यामध्ये  व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळून येतं. याशिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट आणि पोटॅशियम असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.याशिवाय शरीरात घातक पदार्थ तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे युरिक ॲसिडचा कमी होऊन सांधेदुखी किंवा संधिवातावर आराम मिळू शकतो.
advertisement

सफरचंद (Apples)

सफरचंद हे नेहमीच आरोग्यासाठी फायद्याचं आहेत. जेव्हा जेव्हा युरिक ॲसिड वाढून सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो तेव्हा तेव्हा सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंदात फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तातली युरिक ॲसिड वाढलेली पातळी कमी करू शकतात. जेणेकरून युरिक ॲसिड नियंत्रणात येऊन सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

किवी (Kiwi)

advertisement
युरिक ॲसिडचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी किवी अतिशय पौष्टिक फळ मानलं जातं. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे रक्तातल्या प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे रक्तातलं युरिक ॲसिड वाढत नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid Problem in winter : हिवाळ्यात युरिक ॲसिडमुळे दुखतात सांधे? मग खा ही फळं, युरिक ॲसिडचा त्रास होईल कमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement