Health Benefits of Peanuts: काय सांगता! ‘हा’ चखणा कॅन्सर, हार्ट ॲटॅकपासून करेल तुमचं रक्षण; वारंवार खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
मुंबई: ‘टाईमपास’ म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ किंवा मद्यप्रेमीचा आवडता ‘चखणा’ अशी शेंगदाण्यांची ओळख. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, हेच शेंगदाणे तुमचं कॅन्सर, हार्ट ॲटॅक आणि डायबिटीस सारख्या गंभीर आजारापासून तुमचं रक्षण करू शकतील तर तुमचा विश्वास नाही बसणार किंबहुना तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. मात्र हे खरं आहे. शेंगदाण्यांमध्ये फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात.त्यामुळे शरीराला आरोग्याला अनेक फायदे होतात. ऐकून खोटं वाटेल पण शेंगदाण्यांमध्ये तर कॅलरीज जास्त असूनही ते वजन कमी करण्यास ही मदत करतात. पाहुयात, शेंगदाणे खाण्याचे फायदे
‘या’ गंभीर आजारांपासून रक्षण करतील शेंगदाणे (Health Benefits of Peanuts)
कॅन्सर
शेंगदाण्यात असलेले पॉलीफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
हार्ट ॲटॅक
शेंगदाण्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.रेसव्हेराट्रॉल नावाचा अँटीऑक्सिडंट हृदयविकाराचा धोका कमी करतो.
advertisement
डायबिटीस
शेंगदाण्यांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी आहे. शेंगदाण्यामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस, मँगनीज आणि कार्बोहायड्रेट्स शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात, म्हणजेच शेंगदाणे खाल्ल्याने रक्तात साखर हळूहळू सोडली जाते. शेंगदाणे खाल्ल्याने महिलांना टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो.
प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत
शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने (प्रोटीन) असतात, जी स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त असतात.मासांहारी व्यक्तींना मांस, मच्छीतून जास्त प्रोटीन्स मिळतात. मात्र शाकाहारी व्यक्ती ते खाऊ शकत नसल्याने त्यांना शेंगदाण्यातून चांगल्या प्रमाणाच प्रोटीन्स मिळतात.
advertisement
तणाव कमी होतो
शेंगदाण्यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे मेंदूमध्ये सेरोटोनिनचं उत्पादन वाढवतं आणि तणाव कमी करायला मदत करतं.
वजन कमी करण्यास मदत
शेंगदाण्यात कॅलरीज आणि फायबर्स जास्त प्रमाणात असतात. कॅलरीजमुळे तत्काळ उर्जा मिळून पोट भरतं. फायबर्समुळे अतिरिक्त भूक लागत नाही. त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.यामुळे अतिरिक्त खाणं टाळलं जातं आणि वजन नियंत्रित राहतो. याशिवाय शेंगदाण्यातले फायबर्स पचनाला चालना देऊन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2024 7:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Benefits of Peanuts: काय सांगता! ‘हा’ चखणा कॅन्सर, हार्ट ॲटॅकपासून करेल तुमचं रक्षण; वारंवार खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे