चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखे घटक असतात. चिया सीड्सचं नियमित सेवन रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं, हृदयाचे आरोग्य राखतं, हाडांना ताकद देतं. असं म्हटलं जातं. काही तज्ज्ञांच्या मते आणि संशोधनानुसार चिया सीड्स वजन कमी करण्यास आणि कंबरेचा घेर कमी करण्यास मदत करू शकतात. पण त्या घेण्याच्या काही पद्धती आहेत. त्या आपण पाहुयात.
advertisement
Oats Recipes : वजन कमी करायचंय आणि टेस्टीसुद्धा खायचंय? ट्राय करा 'या' 5 भन्नाट ओट्स डिशेस!
चिया-लिंबू डिटॉक्स वॉटर
साहित्य : 1 टेबलस्पून चिया सीड्स, 1 ग्लास कोमट पाणी, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून मध
कृती : चिया सीड्स 20 मिनिटं पाण्यात भिजवा. एका ग्लासमध्ये इतर सर्व साहित्य मिसळा, त्यावर चिया सीड्स घाला. नीट ढवळून घ्या.
कसं कार्य करतं : सकाळी लवकर रिकाम्या पोटी खाणं चांगलं. हे मिश्रण हायड्रेट करण्यास मदत करतं, चयापचय वाढवतं आणि जेवणादरम्यान पोट भरलेलं ठेवतं.
चिया स्मूदी
साहित्य : 1 कप बदाम दूध, 1 टेबलस्पून चिया सीड्स, अर्ध केळं, 1 टीस्पून पीनट बटर किंवा दालचिनी आणि मूठभर पालक किंवा ओट्स हे ऑप्शनल आहे. असेल तर वापरा नाहीतर नाही.
कृती : सर्व साहित्य ब्लेंडर जारमध्ये घाला. चांगलं ब्लेंड करून घ्या आणि ताजं सर्व्ह करा.
कसं काम करतं : हे जेवणाला पर्याय आहे. कमी-कॅलरी, पोषक तत्वांनी समृद्ध स्मूदी आहे ज्यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रथिने असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
चिया-दही परफेट
साहित्य : दीड कप ग्रीक दही, 1 टेबलस्पून चिया सीड्स, मूठभर बेरी (स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी), 1 टीस्पून मध
कृती : सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून घ्या. 20 मिनिटं राहू द्या आणि नंतर खा.
कसं कार्य करतं : हा भूक न लागण्यासाठी मध्यरात्री किंवा संध्याकाळी एक उत्तम नाश्ता आहे. हे प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे, जे दीर्घकाळ तृप्त होण्यास मदत करतं, म्हणजे भूक लागत नाही. जास्त खाणं टाळण्यास मदत करतं.
चिया पुडिंग
साहित्य : 2 टेबलस्पून चिया सीड्स, 1 कप बदाम किंवा नारळाचं दूध, चिमूटभर दालचिनी किंवा कोको पावडर, सफरचंद किंवा किवी.
कृती : चिया सीड्स रात्रभर भिजत ठेवा. सकाळी सर्व पदार्थ एकत्र करा. फक्त सफरचंद किंवा किवी वरून घाला.
कसं काम करतं : नाश्त्यासाठी किंवा रात्री जेवणानंतर स्वीट म्हणून चांगलं. यात प्रथिने आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं, ते दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेलं ठेवतं आणि जंक स्नॅक्स टाळण्यास मदत करतं.