Detox Drink : घरी बनवा सोपं आणि सुटसुटीत डिटॉक्स ड्रिंक, शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी चांगला पर्याय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि बडीशेप शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात दाहक-विरोधी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, यामुळे शरीराला आतून स्वच्छ करण्यास खूप मदत होते. पोट फुगणं आणि पोटात गॅस होणं यासारख्या समस्यांवरही हा खूप चांगला उपाय आहे. पोट साफ नसणं किंवा दिवसभर आम्लपित्त जाणवत असेल तर हे पेय खूपच उपयुक्त आहे.
मुंबई : बाह्य स्वच्छतेप्रमाणेच शरीराची आतून स्वच्छता करणंही तितकंच गरजेचं आहे. याला बॉडी डिटॉक्सिंग म्हणतात, म्हणजेच शरीरात साचलेली घाण पूर्णपणे काढून टाकणं, यामुळे संसर्ग किंवा आजार होण्यापासून शरीराचं रक्षण होतं आणि वजनही वेगाने कमी होतं.
सध्या अनेक डिटॉक्स ड्रिंक्स ट्रेंडमध्ये आहेत, पण एक सोपं डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घरी बनवू शकता. याला जास्त वेळही लागत नाही. हे दररोज सकाळी प्यायल्यानं पोट पूर्णपणे साफ होईल.
डिटॉक्स ड्रिंकचे फायदे
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, त्यात वापरण्यासाठीची प्रत्येक गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. हे पेय आठवडाभर प्यायलं तर तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील आणि तुम्हाला खूप ताजंतवानं वाटेल. याशिवाय, या पेयामुळे त्वचा स्वच्छ राहते कारण यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात.
advertisement
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी, सर्वप्रथम जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि बडीशेप घ्यावी लागेल. हे सर्व जिन्नस एकत्र करुन पावडर बनवू शकता.
दररोज रात्री कोमट पाण्यात हे चारही जिन्नस मिसळा आणि झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर, गाळून पिऊ शकता. हे पाणी एका लहान बाटलीत भरून ऑफिसमध्ये देखील घेऊन जाऊ शकता, दिवसातून दोन ते तीन वेळा हे पाणी प्यायल्यानं शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते.
advertisement
जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि बडीशेप शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात दाहक-विरोधी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, यामुळे शरीराला आतून स्वच्छ करण्यास खूप मदत होते. पोट फुगणं आणि पोटात गॅस होणं यासारख्या समस्यांवरही हा खूप चांगला उपाय आहे. पोट साफ नसणं किंवा दिवसभर आम्लपित्त जाणवत असेल तर हे पेय खूपच उपयुक्त आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Detox Drink : घरी बनवा सोपं आणि सुटसुटीत डिटॉक्स ड्रिंक, शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी चांगला पर्याय