शेंगदाण्याची चटणी
लागणारे साहित्य
½ कप शेंगदाणे, ½ कप भाजलेली चणा डाळ, ४ हिरव्या मिरच्या, थोडं आलं, ½ चमचा मीठ, ½ कप पाणी
फोडणीसाठी
३ चमचे तेल, ½ चमचा मोहरी, ½ चमचा उडीद डाळ, १ सुकी लाल मिरची, काही कढीपत्त्याची पानं
कृती
कढईत शेंगदाणे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून थंड होऊ द्या. त्याच कढईत भाजलेली चणा डाळ हलकी खमंग होईपर्यंत परतून घ्या. मिक्सरमध्ये शेंगदाणे, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ आणि थोडं पाणी घालून बारीक वाटा. आवश्यक असल्यास थोडं पाणी वाढवा. छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी चटणीवर टाकून चांगलं मिसळा.
advertisement
कांदा-टोमॅटो चटणी
लागणारं साहित्य
१ मोठा कांदा (मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेला), २ टोमॅटो (मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेले), १ इंच आलं, २ लसूण पाकळ्या, ४ सुक्या लाल मिरच्या, १ मोठा चमचा उडीद डाळ, १ मोठा चमचा चणा डाळ, थोडा चिंचेचा गर, ½ चमचा मीठ, ½ कप पाणी
फोडणीसाठी
२ चमचे तेल, ½ चमचा मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या
कृती
कढईत तेल गरम करून उडीद डाळ, चणा डाळ आणि सुक्या लाल मिरच्या परता. दाळं सोनेरी होऊ लागली की त्यात कांदा, आलं आणि लसूण घालून थोडं भाजा. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. गॅस बंद करून थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये चिंच, मीठ, पाणी घालून वाटा. तयार चटणीवर फोडणी करून सर्व्ह करा.
या दोन्ही चटणी डोसा, इडली, वडा किंवा स्नॅक्ससोबत सर्व्ह केल्या की रोजच्या जेवणात नवा स्वाद आणतात आणि खाण्याचा आनंद दुप्पट करतात.
