टिशूने हलके थोपटून सुरुवात करा
कार्पेटवर काहीही सांडलं की बरेचजण लगेच ते पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. पण हा प्रकार कार्पेटचे धागे आणि कापड खराब करू शकतो. अशावेळी सांडलेला द्रव पदार्थ, चहा किंवा कॉफी पुसण्याऐवजी ते पटकन शोषून घेईल असा टिशू पेपर किंवा कॉटनच्या कपडाचा वापर करा. चहा-कॉफी जिथे सांडली आहे तिथे टिशू ठेवा आणि त्याला हलक्या हाताने थोपटा. यामुळे टिशून चहा कॉफी शोशून घेईल आणि डाग घट्ट होणार नाही किंवा पसरणार नाही. यानंतर तुम्ही कार्पेट स्वच्छ करण्यासाठी घेऊन शकता.
advertisement
सोडा वॉटरने हटवा कठीण डाग
कॉफी, चाय किंवा वाइनसारखे हट्टी डाग काढण्यासाठी सोडा वॉटर अत्यंत उपयोगी ठरते. सोडा वॉटर डागांचे तंतू मऊ करतं, त्यामुळे ते सहज सुटतात. मात्र या प्रक्रियेनंतर कार्पेटला ड्राय क्लीन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे उरलेली ओलसरता पूर्णपणे निघून जाते.
बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर
बुटांची माती, चिकट मळ किंवा अनेक दिवसांचे हट्टी डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर यांचे मिश्रण प्रभावी ठरते. हे मिश्रण डाग सैल करतं आणि मळ सहज बाहेर काढतं. हा उपाय केल्यानंतर कार्पेटला पूर्ण ड्राय क्लीन करणं आवश्यक आहे.
तेल-ग्रीसचे डाग?
तेलाचे डाग लगेच कार्पेटमध्ये मुरतात आणि ते काढणं कठीण असतं. अशावेळी डागावर कॉर्नस्टार्च किंवा बेकिंग सोडा शिंपडल्यास तेल शोषलं जातं. पावडरने ग्रीस पूर्णपणे शोषल्यावर कार्पेट सहजपणे साफ करता येतं. नंतर साधं ड्राय क्लीन केलं तरी कार्पेट नव्यासारखं दिसतं.
घरातील सवयी बदलून कार्पेट ठेवा स्वच्छ
कार्पेटचा वापर जास्त असल्याने त्यावर अस्वच्छ पाय, धूळ आणि माती लवकर साठते. त्यामुळे घराच्या आत स्वतंत्र चप्पल वापरल्यास कार्पेट अधिक काळ स्वच्छ राहू शकतं. ही छोटी सवय मोठा फरक घडवते.
आठवड्यातून एकदा व्हॅक्यूमिंग गरजेचं
कार्पेटवर साचणारी धूळ, केस, माती यासाठी आठवड्यातून किमान एकदा ते व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करणं आवश्यक असते. नियमित व्हॅक्यूमिंग केल्याने कार्पेटचा टेक्स्चर आणि रंग दोन्ही जास्त काळ तितकेच सुंदर राहतात.
वर्षातून दोनदा प्रोफेशनल क्लिनिंग उत्तम
घरात मुलं किंवा पेट्स असतील तर कार्पेट अधिक मळते. त्यामुळे वर्षातून किंमान दोन वेळा त्याची प्रोफेशनल क्लिनिंग करणं आवश्यक असते. यामुळे धूळ, बॅक्टेरिया आणि खोल मुरलेले डाग पूर्णपणे हटतात आणि कार्पेटचे आयुष्य वाढते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
