Fish Market: तुमच्या ताटातून गायब होणार पापलेट, धक्कादायक माहिती समोर, 15 दिवसांत..., Video

Last Updated:

Fish News: बहुतांश मासे प्रेमींचा आवडता मासा म्हणजे पापलेट होय. आता हा मासा संकटात असून लवकरच ताटातून गायब होण्याची शक्यता आहे.

+
Fish

Fish Market: तुमच्या ताटातून गायब होणार पापलेट, धक्कादायक माहिती समोर, 15 दिवसांत..., Video

मुंबई : महाराष्ट्राचा ‘राज्य मासा’ म्हणून मान प्राप्त केलेला सिल्व्हर पापलेट सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. वसई–पालघर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळणारा हा चविष्ट, कमी काट्यांचा आणि उच्च पोषणमूल्य असलेला मासा गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी होत गेला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तज्ज्ञांच्या मते पुढील 15 दिवसांत पापलेटची मासेमारीच थांबवावी लागू शकते आणि बाजारात मिळणारा ताजा पापलेट कायमचा दुर्मिळ होण्याची शक्यता वाढली आहे.
या संकटाच्या मुळाशी एकच मोठे कारण दिसते. लहान पिल्लांची बेसुमार मासेमारी. केवळ 70 ते 100 ग्रॅम वजनाची पापलेटची पिल्ले मोठे होण्यापूर्वीच पकडली जात असल्यामुळे 300 ते 500 ग्रॅमचा दर्जेदार पापलेट आणि त्याहून मोठा ‘सुपर सरंगा’ आज जवळजवळ दिसेनासा झाला आहे. सातपाटी मच्छीमार सोसायटीच्या अहवालानुसार, गेल्या 12 वर्षांत पापलेटचे एकूण उत्पादन 20–30 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, तर निर्यातीत सर्वाधिक मागणी असलेल्या मोठ्या ‘सुपर सरंगा’च्या उत्पादनात तब्बल 95 टक्क्यांची घट झाली आहे.
advertisement
मच्छीमार सांगतात की, हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढले आहे, तर प्रदूषण आणि किनारपट्टीवरून होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यामुळे पापलेटच्या नैसर्गिक प्रजननावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यातच मोठ्या ट्रॉलर्सची स्पर्धा आणि बारीक जाळ्यांचा वाढता वापर यामुळे लहान पिल्लांच्या पकडीला आळा लागत नाही. नियम असले तरी अंमलबजावणी अत्यल्प असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. “आमच्या जाळ्यांत आता मासेच अडकत नाहीत. आधी जिथे 500–700 ग्रॅमचा पापलेट सहज मिळायचा, तिथे आज 70–90 ग्रॅमचा पापलेटही मिळणे अवघड झाले आहे,” असे स्थानिक मच्छीमार सांगतात.
advertisement
उत्पादनातल्या या मोठ्या घटीचा सरळ परिणाम बाजारभावांवर झाला आहे. पूर्वी छोटा पापलेट किलोला 500 ते 700 रुपयांत मिळत होता, तो आता 700 ते 1,100 रुपये दरम्यान विकला जात आहे. घरगुती वापरासाठी सर्वाधिक घेतला जाणारा मध्यम आकाराचा पापलेट 1,200 ते 1,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या पापलेटचे भाव तर 1,800 ते 2,500 रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत. सर्वात मोठा धक्का ‘सुपर सरंगा’च्या भावात दिसतो. हा आकार आता बाजारात जवळजवळ मिळतच नाही आणि मिळालाच तर त्याची किंमत किलोला 3,000 रुपयांहून अधिक जाते.
advertisement
या सर्वांमुळे साध्या खवय्यांपासून ते हॉटेल व्यवसायापर्यंत सगळ्यांनाच ताज्या पापलेटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवसांत जर मासेमारी थांबवलीच गेली, तर बाजारात ताजा पापलेट मिळण्याची शक्यता नगण्य राहील आणि फक्त फ्रीज्ड स्टॉकवर अवलंबून राहावे लागेल. तज्ज्ञांचे मत आहे की, पापलेटच्या पिल्लांच्या पकडीवर कठोर बंदी, बारीक जाळ्यांवर निर्बंध, समुद्रातील प्रजनन क्षेत्रांचे संरक्षण आणि नो-फिशिंग हंगामाचे काटेकोर पालन, अशा निर्णायक उपाययोजना तातडीने केल्या नाहीत, तर ‘राज्य मासा’ ही ओळख फक्त नावापुरतीच उरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Fish Market: तुमच्या ताटातून गायब होणार पापलेट, धक्कादायक माहिती समोर, 15 दिवसांत..., Video
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement