हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर करा ‘हे’ उपाय.
तुळस-आल्याचा चहा:
जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर सुरूवातीला तो घरगुती उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसताच तुम्ही तुळस आणि आल्याचा चहा प्या. तुळस आणि आल्याच्या औषधी गुणधर्मांमुळे तुम्हाल 2 दिवसात बरं वाटेल आणि तुमचा आजार पळून जाईल. मात्र हे करूनही सर्दी-खोकला कमी झाला नाही किंवा सर्दी-खोकल्याच्या त्रासात वाढ जरी तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
आलं आणि मध:
तज्ज्ञांच्या मते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मध आणि आलं खूप फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही आलं वाटून त्याचा रस काढून त्यात 1 किंवा 2 चमचे मध टाकून पिऊ शकता. मात्र तुम्हाला जर जळजळीचा त्रास असेल तर कोमट पाण्यात मध घालून, त्यात आलं किसूनही तुम्ही ते पाणी पिऊ शकता. याने तुमच्या घशाला आराम मिळून सर्दी खोकल्याचा त्रास निश्चित कमी होईल. याशिवाय तुम्हाला ॲसिडिटा त्रासही होणार नाही.
Winter special laddu: हिवाळ्यात खा ‘हे’ स्पेशल लाडू; दूर पळतील सगळे आजार, राहाल एकदम फिट
मध आणि लवंग:
तुम्हालाही सर्दी किंवा खोकला किंवा दोन्हींचा त्रास होत असेल तर लवंग आणि मधाचं सेवन करा. लवंग बारीक करून मधात मिसळून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा लवंग मधाचं सेवन करू शकता. यामुळे सर्दी-खोकल्यापासून निश्चित आराम मिळेल. याशिवाय खोकल्याची उबळ रोखण्यासाठी तुम्ही लवंग जीभेखाली ठेऊ शकता.
कोमट पाण्याच्या गुळण्या:
सर्दी खोकल्यासोबतच तुमचा घसा खवखवत असेल, घसा बसला असेल किंवा गिळायला त्रास होत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणं फायदेशीर आहे. जर तुमच्या घरी बिटाडिन असेल तर तुम्ही कोमट पाण्यात 1 झाकण बिटाडिन टाकून तुम्ही गुळण्या करू शकता. यामुळे तुम्हाला अवघ्या काही वेळातच फरक जाणवेल.
दूध आणि हळद:
हळदीची ओळख नैसर्गिंक अँटिबायोटिक अशी आहे. याशिवाय आरोग्यासाठी दूध पिणं हे फायद्याचं आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दुधात एक चमचा हळद टाकून ते दूध पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुमच्या शरीरातलं संक्रमण कमी होईल.
वाफ घेणे :
सर्दी खोकल्यापासून सर्वात जास्त आराम वाफ घेतल्याने मिळतो. यामुळे चोंदलेलं नाक उघडतं. तुम्ही साध्या पाण्याची वाफ शकता किंवा त्यात निलगिरीचं तेल, लेमनग्रास तेल किंवा लवंग तेल टाकूनही वाफ घेऊ शकता. यामुळे तुम्हाला घसादुखीपासून बराच आराम मिळेल.
त्यामुळे यापुढे तुम्हालाही सर्दी-खोकल्याचा त्रास झाला तर थेट कोणतीही औषधं घेण्यापूर्वी किंवा हे घरगुती उपाय अवश्य करून पाहा.तुम्हाला निश्चित आराम मिळेल अन्यथा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता.