पोटाच्या समस्या - सर्वात सामान्य कारणं म्हणजे पोटाच्या समस्या. पचनक्रिया बिघडणं, जळलेल्या किंवा जास्त मसालेदार अन्नामुळे पोट खराब होणं किंवा अन्नातील बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारा संसर्ग. याशिवाय गॅस, अॅसिडिटी किंवा अन्नातून विषबाधा झाल्यानं उलट्या होऊ शकतात.
Hyper Acidity : हायपर ॲसिडिटी का होते? आयुर्वेदिक उपचारांनी हा त्रास कमी होतो?
advertisement
कधीकधी डोकेदुखी किंवा मायग्रेनमुळे हा त्रास होऊ शकतो. जास्त ताण, चिंता, किंवा अचानक आलेला वास किंवा अन्नपदार्थ यामुळे देखील मळमळ होऊ शकते.
Dehydration : उलट्या होण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे Dehydration किंवा शरीरात पाणी आणि खनिजांची कमतरता. विशेषतः मुलं आणि वृद्धांसाठी हे धोकादायक ठरु शकतं, कारण त्यांना अशक्तपणा लवकर जाणवू शकतो. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे महिलांमधे मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या होणं देखील सामान्य आहे.
उलट्या टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेदात उलट्यांकडे अनेक प्रकारे पाहिलं जातं. वायू, पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे पोटाच्या समस्या जाणवू शकतात आणि उलट्या होऊ शकतात. आयुर्वेदिक उपायांमधे प्रामुख्यानं शरीराला हायड्रेट ठेवणं आणि हलकं अन्न खाणं हे दोन प्रमुख मुद्दे.
नारळाच्या पाण्यात थोडी वेलची पावडर घालून हळूहळू प्यायल्यानं पोट आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. आल्याचा चहा प्यायल्यानं मळमळ कमी होण्यास आणि पोट शांत होण्यास मदत होते. उकडलेले किंवा फुगलेले तांदूळ किंवा तांदळाचे पाणी यासारखं हलकं आणि सोपं अन्न देखील खूप फायदेशीर आहे.
Diabetes : मधुमेह कायमचा आणि पूर्णपणे बरा होतो का ? जाणून घ्या डायबिटीसचं सत्य
याशिवाय, शरीराचं इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी घरगुती ओआरएस म्हणजेच स्वच्छ पाण्यात, मीठ आणि साखर मिसळून बनवलेलं मिश्रण हळूहळू प्यावं.
या आयुर्वेदिक उपायांमुळे शरीरात अशक्तपणा कमी जाणवतो आणि शरीराला ताकद मिळते.
याव्यतिरिक्त, उलट्या होत असताना शरीराला विश्रांती देणं महत्वाचं आहे. जास्त जेवणं, जास्त पाणी पिणं किंवा तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. पाणी, नारळ पाणी किंवा हलकं सूप लहान घोटात पिणं चांगलं.
लक्षात ठेवा की जर सतत उलट्या होत असतील, अत्यंत अशक्तपणा येत असेल किंवा शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
