तुमच्या या समस्येवर इथे बेस्ट सोल्युशन्स आहेत. इंस्टाग्रामवर कोमल कपाडिया या इन्फ्लुएन्सरने साडीचा रंग आणि त्यासाठी कोणत्या रंगाच्या बांगड्या बेस्ट कॉम्बिनेशन आहेत याबद्दल माहिती दिली आहे. याने तुमचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटेल.
साडीच्या रंगानुसार अशा निवडा बांगड्या..
जसं बऱ्याचदा आपण काळ्या रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाच्याच बांगड्या घालतो असाच आपण इतर रंगांच्या साड्यांसोबतही करतो. पण ते आता बोअरिंग झालं. आता फॅशनमध्ये कॉन्ट्रास्ट मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला इथे दिलेलं कलर कॉम्बिनेशन्स छान दिसतील आणि नेहमीच्या कॉम्बिनेशनपेक्षाही काहीतरी वेगळं, युनिक दिसेल.
advertisement
हिरव्या रंगाची साडी : हिरव्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही मॅजेंटा किंवा लाल रंगाच्या बांगड्या घाला. याने तुमचा लूक खूप रॉयल दिसेल.
लाल रंगाची साडी : लाला रंगाच्या साडीसोबत तुम्ही टिल किंवा बॉटल ब्लू रंगांच्या बांगड्या घालू शकता. हे कलर कॉम्बिनेशन तुमचा लूक आणखी वाढवेल.
निळ्या रंगाची साडी : निळ्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही ऑरेंज म्हणजेच केशरी किंवा मस्टर्ड रंगाच्या बांगड्या घालू शकता. याने तुमचा लूक एन्हान्स होईल.
ऑरेंज रंगाची साडी : ऑरेंज म्हणजेच केशरी रंगाच्या साडीसोबत तुम्ही कॉबल्ट ब्लू किंवा टिल रंगाच्या बांगड्या घालू शकता. हे कलर एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात.
पिवळ्या रंगाची साडी : पिवळ्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही पर्पल म्हणजे जांभळा किंवा रॉयल ब्लू कलरच्या बांगड्या घालू शकता. हे कॉन्ट्रास्टींग कलर्स खूप छान दिसतात.
पर्पल रंगाची साडी : पर्पल म्हणजेच जांभळ्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही लेमन यलो किंवा मिंट ग्रीन कलरच्या बांगड्या घालू शकता. याने तुमचा लूक खूप रॉयल दिसेल.
गुलाबी रंगाची साडी : पिंक म्हणजेच गुलाबी रंगाच्या साडीसोबत तुम्ही फॉरेस्ट ग्रीन किंवा नेव्ही ब्लू रंगाच्या बांगड्या घालू शकता. हे कलरसुद्धा एकमेकांसोबत खूप छान जातात.
ब्राऊन रंगाची साडी : ब्राऊन रंगाच्या साडीसोबत तुम्ही टरक्वॉईश किंवा स्काय ब्लू म्हणजेच आकाशी रंगांच्या बांगड्या घालू शकता. हे कलर कॉम्बिनेशन तुमचा लूक आणखी वाढवेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
