गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्ट्रेल नावाचं हॉर्मोन वापरलेलं असतं. त्यालाच ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल देखील म्हटलं जातं. या गोळ्यांचा भविष्यातील प्रेग्नन्सीवर परिणाम होतो का, या गोळ्यांमुळे वंध्यत्व येऊ शकतं का, या गोळ्यांमुळे वजन वाढतं का, सातत्याने गोळ्या घेतल्याने पीसीओएसची समस्या होऊ शकते का? असे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. तर गर्भनिरोधक गोळ्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
गर्भनिरोधक गोळ्या भविष्यातील प्रेग्नेन्सीवर परिणाम करतात का?
गर्भनिरोधक गोळ्यांचा भविष्यातील प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. अनेक स्त्रियांनी गोळी घेणं थांबवल्यानंतर त्यांचे हॉर्मोन्स स्रावाच्या नैसर्गिक पातळीवर परत येतात. पण पाळीची नैसर्गिक सायकल परत येण्यासाठी काही महिने लागू शकतात.
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे भविष्यात वंध्यत्व येऊ शकते का?
रिपोर्ट्सनुसार, हॉर्मोनल बर्थ कंट्रोलर वापरल्याने भविष्यात मुलं जन्माला घालण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होत नाही.
बर्थ कंट्रोल गोळ्यांमुळे वजन वाढतं का?
बर्थ कंट्रोल गोळ्यांमुळे थेट वजन वाढू शकत नाही, परंतु गोळ्याच्या काही साईड इफेक्टमुळे वजन वाढू शकते.
गोळ्यांमुळे पीसीओएसची समस्या होऊ शकते का?
गोळ्यांमुळे होणारा पीसीओएस हा पीसीओएसचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर विकसित होऊ शकतो. जे ओव्हुलेशन होऊ देत नाही. बऱ्याच महिलांनी या गोळ्या थांबवल्या की त्यांचं ओव्हुलेशन आणि मासिक पाळी नियमित होतात, तर काही महिलांचं काही महिने किंवा वर्षे पुन्हा ओव्हुलेशन सुरू होत नाही.
इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व येऊ शकते का?
रिपोर्ट्सनुसार, इमर्जन्सी गर्भनिरोधकांसाठी वापरण्यात येणारी औषधं किंवा गोळ्या भविष्यातील प्रजननक्षमतेला नुकसान पोहोचवत नाहीत. ज्या महिन्यात ही गोळी घेतली जाते त्या महिन्यात महिलांना अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो. मात्र, या गोळ्यांचा प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही.