TRENDING:

Skin Care : कोरियन स्किनकेअर रुटिनचा बोलबाला, काय आहे 4-2-4 रुल ? सगळ्यांना सूट होतो का ?

Last Updated:

महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून ते ट्रेंडिंग ब्युटी हॅक्सपर्यंत, सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. सोशल मीडियावर अनेक स्किनकेअर ट्रेंड आणि स्किनकेअर रुल्स व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक म्हणजे 4-2-4 हा नियम. याची क्रेझ सध्या वाढते आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी किंवा नवीन वर्षाच्या संकल्पासाठी काही विचार करत असाल तर ही माहिती नक्की वाचा. स्वत:च्या तब्येतीकडे तर नक्की लक्ष द्या. तसंच चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी ही कोरियन स्किनकेअर ट्रिक नक्की वापरुन पाहा.
News18
News18
advertisement

महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून ते ट्रेंडिंग ब्युटी हॅक्सपर्यंत, सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात.

सोशल मीडियावर अनेक स्किनकेअर ट्रेंड आणि स्किनकेअर रुल्स व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक म्हणजे 4-2-4 हा नियम. याची क्रेझ सध्या वाढते आहे.

कोरियन स्किनकेअर आजकाल अधिकाधिक लोकप्रिय होते आहे आणि त्यातला 4-2-4 नियम चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी खूप उपयुक्त आहे.. यासाठी सुरुवातीला ऑयल बेस्ड क्लीन्सरनं चार मिनिटं मालिश करा.

advertisement

Spot Jogging : स्पॉट जॉगिंग करणं का महत्त्वाचं ? घरी करता येईल असा सोपा व्यायाम

दोन मिनिटं वॉटर बेस्ड क्लीन्झरनं चेहरा स्वच्छ करा. चार मिनिटं भरपूर पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा. ही स्किनकेअर पद्धत लोकप्रिय झाली कारण त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी ती उपयुक्त ठरते आणि  यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.

ऑइल बेस्ड क्लीन्झरमुळे मेकअप, वॉटरप्रूफ सनस्क्रीन आणि सेबम न घासता काढणं शक्य होतं. दुसऱ्यांदा क्लीन्झ केल्यानं उरलेले कोणतेही अवशेष आणि घाण काढून टाकली जाते.

advertisement

चेहरा बराच वेळ धुतल्यानं कोणतंही मेकअप उत्पादन छिद्रांमधे राहत नाही. त्वचेला जास्त वेळ मसाज केल्यानं रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचा काही काळासाठी निरोगी आणि चमकदार दिसू लागते.

Skin Care : त्वचेसाठी आहार महत्त्वाचा, निरोगी त्वचेसाठी उत्तम पदार्थ

यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या स्किनकेअरनं आलेली चमक कायमस्वरूपी नसते. मुरुमं, रंगद्रव्य किंवा वृद्धत्व यासारख्या समस्यांवर हा उपाय दीर्घकालीन नाही. हा नियम त्वचा स्वच्छ करण्याचा एक प्रकार आहे.

advertisement

तसंच ही पद्धत सगळ्यांनाच लागू होत नाही. चेहऱ्याची जास्त प्रमाणात स्वच्छता केल्यानं संवेदनशील किंवा मुरुम-प्रवण त्वचेला त्रास होऊ शकतो. ज्यामुळे त्वचेवरचे थर बिघडू शकतात. त्वचेची जास्त स्वच्छता केल्यानं चेहऱ्यातलं सर्व नैसर्गिक तेल निघून जातं आणि त्यामुळे कोरडेपणा, लालसरपणा, मुरुमं आणि रोसेसिया किंवा एक्झिमा सारख्या समस्या वाढू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीपासून मिळेल संरक्षण, हिवाळ्यात खा विड्याचे पान, आणखी फायदे कोणते?
सर्व पहा

स्किनकेअरमधे विविध ट्रेंड येत असले तरी स्वत:च्या तब्येतीला काय अनुकूल आहे त्याप्रमाणेच या पद्धतींचा वापर करा. यासाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : कोरियन स्किनकेअर रुटिनचा बोलबाला, काय आहे 4-2-4 रुल ? सगळ्यांना सूट होतो का ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल