जाणून घेऊयात हिवाळ्यात जिरं खाण्याचे फायदे
घशाचे आजार
हिवाळ्यात अनेकांना सर्दी, खोकला किंवा घसादुखीचा त्रास होतो. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर औषधं देतात मात्र त्याचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. अशावेळी जिरं खाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. जिऱ्यांचे काही दाणे तोंडात ठेवून चघळल्यास घशाची जळजळ आणि खवखव कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल. यामुळे घशांचा संसर्गही कमी व्हायला मदत होईल. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी जिऱ्यांचा चहा फायदेशीर ठरतो. यामुळे चोंदलेले नाक मोकळं व्हायला मदत होते.
advertisement
पचन सुधारतं
हिवाळ्यात थंडीचा परिणाम पचनक्रियेवर होतो. ज्यामुळे गॅसेस,अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जिरं खाल्ल्यामुळे पचन सुधारायला मदत होते. जिऱ्याचे दाणे खाणं किंवा गरम पाण्याच जिरं उकळून ते पाणी प्यायल्यास फायदा होईल. यामुळे वजन देखील कमी व्हायला मदत होईल.
हे सुद्धा वाचा : घरबसल्या वजन कमी करायचं आहे ? ‘या’ पद्धतीने प्या जिरं पाणी आणि फरक पाहा
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आजारी पडण्याची शक्यता बळावते. अशावेळी जिरं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जिऱ्यात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हिवाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
‘असा’ करा जिऱ्याचा उपयोग
जिऱ्याचा चहा : जसं आपण ग्री टी पितो, त्याच पद्घतीने हिवाळ्यात जिऱ्याचा चहा प्या. पाण्यात जिरं घालून ते मंद आचेवर उकळून घ्या. त्यात थोडंसं आलं घातलं तर दुहेरी फायदा होईल.
जिऱ्याचा काढा : तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय असेल तर त्या पाण्यात जिऱ्याचे काही दाणे टाकून दे पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या घशालाही आराम मिळेल आणि पचनही सुधारेल.
